मुंबई :
ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची माहिती पुस्तिका येत्या दोन दिवसांत प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यंदा नव्याने अनेक महाविद्यालयांची भर पडणार आहे. या नव्या महाविद्यालयांचे सांकेताक क्रमांक माहिती पुस्तिकेत उपलब्ध करून देण्यासाठी अद्याप ती संकेतस्थळावर टाकण्यात आलेली नाही. महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर माहिती पुस्तिका उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा : अकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात
मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणार्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मंगळवारी दुसर्या दिवसापर्यंत सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ऑनलाईन अर्जाचा भाग १ विद्यार्थ्यांकडून भरण्यात येत असून भरलेल्या अर्जाची पडताळणीही विद्यार्थ्यांना करून घ्यायची आहे. शालेय शिक्षण विभागाकडून मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या पाच महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. त्यासाठी ३० मेपासू भाग-१ साठी नोंदणी सुरू झाली आहे.