Voice of Eastern

मुंबई : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगामध्ये ऑनलाईन बैठका घेण्यात येत होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाकडून व्यवस्थापन बैठका ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. यामुळे व्यवस्थापन सदस्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, कुलगुरू विद्यार्थी व विद्यापीठाच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक ४ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने होत असल्याचे प्रशासनाकडून सर्व सदस्यांना २९ मे रोजी ईमेलद्वारे कळवण्यात आले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असून, जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. राज्यासह देशभरात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडून येत असताना कुलगुरू अद्यापही व्यवस्थापन परिषदेची बैठक ऑनलाईन घेण्याचे पत्र काढत आहेत. याबद्दल व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाईन बैठकांमध्ये नेटवर्कच्या समस्या येत असल्याने विषय मांडताना अडथळे येतात. त्यामुळे अनेक प्रश्नांवर प्रभावीपणे चर्चा होत नाही. या उलट बैठक प्रत्यक्षात झाल्यास प्रश्न आणि समस्या व्यवस्थित मांडून, चर्चा होऊन अनेक प्रश्न सोडविले जात असल्याने व्यवस्थापन परिषदेची बैठक ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष पद्धतीनेच व्हावी अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.

कुलगुरू हे विद्यार्थी व विद्यापीठांच्या प्रश्नांपासून पळ काढत आहेत. मागील वेळी त्यांनी वाढत्या उन्हाचे कारण देत बैठक ऑनलाईन घेतली होती. मात्र यावेळी बैठक ऑनलाईन घेण्याबाबत कोणतेही कारण देण्यात आले नसल्याचेही सदस्यांकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

एलएलएमच्या प्रवेश परीक्षेकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष

तरुणांमधील उद्योजकतेला स्टार्टअप प्रदर्शनातून प्रोत्साहन

Voice of Eastern

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत घट नाही

Voice of Eastern

Leave a Comment