Voice of Eastern

महाड :

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे रायगड विभागातून तब्बल ६४ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेत ग्रुप बुकींगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रायगडच्या एसटी विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली.

आषाढी एकादशी १० जुलै रोजी आहे. गेल्या दोन वर्ष कोरोनाचा प्रभाव इच्छा असतानाही वारकर्‍यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येत नव्हते. यंदा वारकर्‍यांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातून जादा एसटी बस गाड्यांची व्यवस्था केली आहे. रायगड जिल्ह्यातील वारकर्‍यांना पंढरपूरला जाता यावे यासाठी तब्बल ६४ जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आठ आगार आहेत. या आगारातून प्रत्येकी आठ जादा गाड्या ८ जुलैपासून सोडण्यात येणार आहेत. पंढरपुरला जाण्यासाठी भाविकांना आपले तिकीट आरक्षित करण्यासाठी आरक्षणाची सुविधादेखील सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जादा बसेस अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, श्रीवर्धन, मुरुड, माणगाव, महाड या आगारातून सुटणार आहेत.

श्री तीर्थश्रेत्र पंढरपुरला जाण्यासाठी ग्रुप किंवा समूहाला पंढरपूरला जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये भाविकांना दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघता येणार आहे. प्रवाशांना पंढरपुरला येण्या-जाण्यासाठी दोन्हींकडून आरक्षण सुविधादेखील सुरू करण्यात येत आहे.

Related posts

डॉन अडकला कोरोनाच्या विळख्यात

नवीन ग्रंथालयाबाबत विद्यापीठाचे तारीख पे तारीख!

Voice of Eastern

अंगणवाडी कर्मचार्‍यांचे बुधवारपासून साखळी धरणे आंदोलन

Leave a Comment