Voice of Eastern

मुंबई :

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशासाठी ७४ विशेष गाड्या सोडल्या आहेत. या विशेष गाड्या मुंबई, नागपूर, पुणे, पनवेल येथून सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांसाठीच्या बुकिंगला ४ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होणार आहे.

मुंबई ते सावंतवाडीदरम्यान ४४ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. नागपूर ते मडगावदरम्यान द्विसाप्ताहिकच्या १२ विशेष सेवा, पुणे ते कुडाळ विशेष ६ सेवा, पुणे ते थिवि, कुडाळ विशेष ६ सेवा आणि पनवेल ते कुडाळ, थिवि विशेष ६ गाड्या सोडण्यात येणार आहेत. www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळावर विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार देण्यात आला आहे.

अशा सुटतील गाड्या

मुंबई – सावंतवाडी दैनिक विशेष

  • ०११३७ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल.
  • ०११३८ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी २.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी दुपारी ३.४५ वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.

नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष

  • ०११३९ विशेष नागपूर येथून २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान प्रत्येक बुधवार आणि शनिवारी रोजी दुपारी ३.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसर्‍या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल.
  • ०११४० विशेष मडगाव येथून २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक गुरुवार आणि रविवारी सायंकाळी ५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसर्‍या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल.

थांबे : वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.

पुणे – कुडाळ विशेष

  • ०११४१ विशेष पुणे येथून २३, ३०, ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल.
  • ०११४२ विशेष कुडाळ येथून दि. २३, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल.

थांबे : लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

पुणे – थिवि/कुडाळ विशेष

  • ०११४५ विशेष पुणे येथून २६ ऑगस्ट, २ आणि ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसर्‍या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल.
  • ०११४६ विशेष कुडाळ येथून २८ ऑगस्ट, ४ आणि ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ५.५० वाजता पोहोचेल.

थांबे : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि.

पनवेल – कुडाळ/थिवि विशेष

  • ०११४३ विशेष ट्रेन पनवेल येथून २८ ऑगस्ट, ४ आणि ११ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल.
  • ०११४४ विशेष ट्रेन थिविम येथून २७ ऑगस्ट, ३ आणि १० सप्टेंबरला दुपारी २.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्‍या दिवशी मध्यरात्री २.४५ वाजता पोहोचेल.

थांबे : रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड

Related posts

DSCA CUP : महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी विजयी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

राज्यात १० जानेवारीच्या मध्यरात्रीपासून दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी

Leave a Comment