Voice of Eastern

मुंबई :

पॉलिटेक्निला विद्यार्थी संख्येत वाढ व्हावी यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यंदाही यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांप्रमाणे यंदाही पॉलिटेक्निला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचा पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दहावीच्या निकालानंतर आतापर्यंत सुमारे ९७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली, तर ६७ हजार विद्यार्थ्यांनी नोदणी शुल्क भरून आपला अर्ज प्रवेशासाठी निश्चित केला आहे.

पदविका प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने स्कूल कनेक्ट उपक्रम राबवत राज्यातील शाळाशाळांमधील विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत त्यांना अभ्यासक्रमाची माहिती दिली. परिणामी पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या १० दिवसांमध्ये ९० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील ६७ हजार विद्यार्थ्यांनी नोदणी शुल्क भरून आपला प्रवेश अर्जही निश्चित केला आहे. मागील दोन वर्षांपासून पॉलिटेक्निकच्या प्रवेशामध्ये सातत्याने १० टक्क्यांनी वाढ होत आहे. कोरोना काळामध्येही पॉलिटेक्निकच्या प्रवेशामध्ये वाढ झाली होती. यंदाही ही वाढ कायम ठेवण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी ६९ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी राज्यभरातील ३६७ संस्थामध्ये प्रवेश घेतले, तर त्यापूर्वी ६२ हजार १२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.

शैक्षणिक अभ्यासक्रम शिष्यवृत्ती योजना, प्रवेश प्रक्रिया, रोजगारांच्या उपलब्ध संधी आदी माहिती शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारीत फेसबुक, ट्विटर आणि इतर डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिध्द केली आहे. स्कूल कनेक्ट उपक्रमामध्ये विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध समाज माध्यमांच्या लिंक्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. या लिंक्सद्वारे संस्था आणि महाविद्यालयांनी तंत्रनिकेतनातील प्रवेशाबाबत जनजागृती व स्कुल कनेक्ट प्रोग्राम राबविण्यात असल्याने गतवर्षी झालेल्या प्रवेशापेक्षा यंदा मोठी वाढ होईल असा विश्वासही तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून अभिनंदन

Voice of Eastern

जागतिक हृदय दिनानिमित्त वाहतूक पोलीस आणि चालकांना स्ट्रेस बॉलचे वितरण

Voice of Eastern

१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा विलंब फी माफ – वर्षा गायकवाड

Voice of Eastern

Leave a Comment