Voice of Eastern
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमीशहर

राम भक्तावर मीरारोड येथे हल्ला, दंगेखोरांवर कारवाई करा, अन्यथा मीरा-भाईंदर बंद ठेऊ – आमदार प्रताप सरनाईक

banner

ठाणे :

संपूर्ण देश श्री राममय झालेला असताना, मिरारोड येथे रविवारी रात्री श्री राम भक्तांवर काही समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तात्काळ एस.आय.टी. स्थापन करून या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व आरोपींवर पुढील ४८ तासांत कठोर कारवाई करावी जेणेकरून शहरामध्ये शांतता व सामाजिक एकता अखंड राहील. अन्यथा नाईलाजास्तव शिवसेना पक्षाचा एक रामभक्त व मिरा-भाईंदर शहराचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून २५ जानेवारी, २०२४ रोजी मला हजारो रामभक्तांबरोबर आंदोलनात सहभागी होऊन शिवसेना पक्षातर्फे शांततामय मार्गाने मिरा-भाईंदर शहर बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.

मीरा रोडच्या नया नगर परिसरामध्ये २१ तारखेच्या रात्री १०.३०च्या सुमारास घडलेल्या हिंसक घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. याबाबत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना शिष्टमंडळासह सोमवारी तातडीने सकाळी भेट घेतली. यावेळी आमदार सरनाईक यांनी सांगितले की, मिरा-भाईंदर शहर हे विविध जाती धर्माच्या नागरिकांचे शहर म्हणून देशभरात ओळखले जाते. किंबहुना या शहराला मिनी इंडिया असे सुध्दा संबोधले जाते. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास या शहरातील हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, जैन तथा सर्व भाषेची नागरिक गुण्यागोविंदाने एकत्रितपणे राहत आहेत. किंबहुना देशामध्ये अनेक वेळा जातीय दंगली भडकलेल्या असताना मीरा-भाईंदर शहरामध्ये त्याचे पडसाद उमटले नाहीत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमधे होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला मीरा-भाईंदर शहरातील काही शांतताप्रिय रामभक्त गाडीवर बजरंगबलीची प्रतिकृती लावून व राम नामाचे भगवे ध्वज लावून शहरामध्ये रामनामाचा जयघोष करीत फिरत असताना नयानगर परिसरातील काही समाजकंटकांनी हल्ला केला व राम ध्वजाची मोडतोड केली.

बजरंगबलीच्या प्रतिमेची विटंबना केली एवढेच करून थांबले नाही तर त्या गाडीमध्ये बसलेल्या रामभक्तांना मारहाण देखील केली. या देशामध्ये कुठेही श्रीरामाचा जयघोष करणे किंवा अल्ला-हो- अकबरचा नारा देणे हा काही गुन्हा ठरत नाही. परंतु, काल श्रीरामाचा जयघोष करणाऱ्या रामभक्तांवर काही समाजकंटकांनी अल्ला हो अकबरचा नारा देत त्यांच्या गाड्या फोडल्या. प्रसार माध्यमातून सोशल मीडीयावर हे व्हिडीओ जाणीवपूर्वक टाकले गेले. कारण शहरातील शांतता या समाजकंटकांना बिघडवायची होती. या व्हिडीओची छाननी केल्यानंतर मी स्वतः रात्री उशीरा आपल्या मोबाईलवर व्हिडीओ पाठवून डी.सी.पी. जयंत बजबले यांच्याशी चर्चा करून या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना केल्या. तसेच या घटनेच्या निषेधार्थ टेम्बा रुग्णालयामध्ये जमलेल्या रामभक्त नागरिकांना शांत करण्यासाठी मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख विक्रम प्रताप सिंह यांना तेथे पाठविले व शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला , असे आमदार सरनाईक म्हणाले.

आमदार सरनाईक पुढे म्हणाले की, रविवारी देशभरामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त हिंदूची दिवाळी साजरी होत असताना त्यामध्ये मुसलमान ही सामील होत आहेत. असे असतानाही या शहरातील हिंदू व मुस्लिमांचे ऐक्य काही समाजकंटकांना नकोसे असून, काही राजकीय नेत्यांचाही यामध्ये सहभाग असण्याचीप शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी जरी ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून १० ते १५ जणांना अटक केली असली तरी व्हिडीओची सत्यस्थिती पाहता या प्रकरणामध्ये किमान २०० ते ३०० समाजकंटकांचा सहभाग दिसत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तात्काळ एस.आय.टी. स्थापन करून या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व आरोपींवर पुढील ४८ तासांत कठोर कारवाई करावी जेणेकरून शहरामध्ये शांतता व सामाजिक एकता अखंड राहील. अन्यथा नाईलाजास्तव शिवसेना पक्षाचा एक रामभक्त व मिरा-भाईंदर शहराचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून २५ जानेवारी, २०२४ रोजी मला रामभक्तांबरोबर आंदोलनात सहभागी होऊन शिवसेना पक्षातर्फे शांततामय मार्गाने मिरा-भाईंदर शहर बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचे म्हणणे ऐकून योग्य ती कडक कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करेल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

Related posts

विरोधकांना ‘गेट वेल सून’चा संदेश; गणेशोत्सव मंडळांची गांधीगिरी

Voice of Eastern

उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या चर्चेला वाटण्याच्या अक्षता; विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

शिक्षण हक्काऐवजी सर्वांसाठी योग्य शिक्षण यावर सरकारने भर द्यावा – प्रा. नितिन करमळकर

Voice of Eastern

Leave a Comment