Voice of Eastern

मुंबई : 

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी व योग्य मान राखण्यासाठी कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले राष्ट्रध्वज तहसिल आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणेस सुपूर्द करण्यात यावेत. हे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम आयोजित करणार्‍या संस्थांवर असेल, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तर व अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखणे आणि अवमान होऊ न देण्यासाठी जागरुक राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक व क्रीडा सामन्यांवेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात-रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरत्र पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून आयोजित संस्थेने अथवा संघटनेने ते समितीस अथवा जिल्हास्तर यंत्रणांकडे जमा करावेत असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Related posts

वडिलांनी केली मुलीला गंभीर मारहाण, चेंबूरमधील घटना

निर्भया पथकामुळे दोन अल्पवयीन मुली सुखरूप

Voice of Eastern

डॉक्टरांनी सामान्य माणसाशी असलेली नाळ तोडू नका – आमदार भरत गोगावले

Leave a Comment