मुंबई
नवं उद्योग सुरू करू इच्छीणाऱ्या युवक, युवतीसाठी घाटकोपर मध्ये जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम संबंधित माहिती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेविका व मराठा प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा रितू राजेश तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी हायस्कुल मध्ये हे शिबिर बुधवार १५ डिसेंबर २०२१ रोजी सांय ५ ते ७ दरम्यान होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे , खासदार मनोज कोटक आणि आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म , लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय आणि मराठा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबिरात युवकांना सूक्ष्म , लघु एवं मध्यम उद्यम तसेच सी.बी कोरा ग्रामोद्योग , खादी व ग्रामद्योग व लघुउद्योग , मुंबई आधारित कौशल्य विकास व प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेट प्रोग्रॅम अंतर्गत स्वयंरोजगार , विक्री तसेच बँक लोन सबसीडी सहित जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम संबंधित माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आयोजक रितू तावडे यांनी सांगितले.