Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मलमपट्टी न करता, प्रश्न कायमस्वरूपीमार्गी लावावा

banner

मुंबई : 

गेले अनेक दिवस कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागतोय. यात आधीच दबघाईला गेले लालपरी अर्थातच एस.टी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना  मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ज्या मध्ये पगार वेळेत न मिळणे या सारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे. एस टी कर्मचाऱ्याची आत्महत्येची बातमी देखील समोर येत आहे.यावरच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारला एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहे. तसेच सरकारने तात्पुरती मलम पट्टी न लावता, सरकारने एस ती कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्ग काढावा असे मत मांडले आहे.

महाराष्ट्रातील विविध भागात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी लाल परी म्हणजेच एस टी महामंडळ गेले अनेक वर्ष अत्यंत चोख आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहे. दसरा, दिवाळी, शिमगा, गणेशोत्सव अश्या अनेक उत्सवांसाठी चाकरमान्यांना आपल्या गावी जायची हाऊस याच लाल परीने पूर्ण केली. मात्र आता याच लाल परीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे. आर्थिक नुकसानीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पगार बाकी आहेत. कारोनाची भीषण परिस्थिती आणि आर्थिक बान लक्षात घेता तर आता चक्क एस टी कर्मचाऱ्याची आत्महत्या. आपल्या हक्काच्या पगारासाठी वेळा या कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. यावरच आता मनसे नेते बाळा नांदगांवकर आक्रमक झाले आहे.

नेमकं काय म्हणाले बाळा नांदगांवकर

आजकाल वारंवार एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या च्या बातम्या येत आहेत. दिवस रात्र लोकांना सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार वेळेवर न देता येणे व त्यासाठी वारंवार आंदोलन करावे लागणे हे चुकीचे आहे. तात्पुरती मलमपट्टी न करता सरकारने आता तरी एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा असे मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून मांडले.

Related posts

महाराष्ट्रातील या डॉक्टरांचा सन्मान…

एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा आश्वासनावर बोळवण!

शाश्वत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी धोरण राबविणार – दीपक केसरकर

Leave a Comment