Voice of Eastern

मुंबई :

कोरोना काळात बैज्यूज, व्हाईट हॅट ज्युनिअर व आकाशयासारखे अनेक शैक्षणिक अ‍ॅप सुरू झाले. मात्र या अ‍ॅपमधून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळत नसून, पालक व विद्यार्थ्यांना चुकीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घेऊन पालकांची प्रचंड लूट सुरू आहे. या अ‍ॅपवर सरकारचा अंकूश नसल्याने हजारो रुपये शुल्क घेऊनही कोणताही शब्द न पाळता या कंपन्या सरळ सरळ सेवा बंद करून पालकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे या शैक्षणिक अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शाळा संस्थाचालकांकडून करण्यात येत आहे.

कोरोनामध्ये प्रत्यक्ष शिक्षण बंद झाल्याने सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. याचाच फायदा घेत अनेक कंपन्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा अ‍ॅप बाजारात आणले. हे अ‍ॅप बाजारात आणण्यापूर्वी त्या कंपन्यांनी सरकारची किंवा शालेय शिक्षण विभागाकडून कोणतही परवानगी घेतलेली नव्हती. अ‍ॅपवर शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम हा सरकारने ठरवलेल्या पाठ्यपुस्तकातून शिकवला जात आहे का, यावर सरकार व शिक्षण तज्ज्ञांचे लक्ष नाही. अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिक्षणामध्ये शैक्षणिक धोरणाची पायमल्ली करण्यात आली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. अ‍ॅप घेण्यापूर्वी कंपन्यांकडून पालकांना मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. अ‍ॅप घेतल्यानंतर पालकांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येत आहे.शैक्षणिक धोरणाच्या चौकटी यांना लागू नाही का असा प्रश्न महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेने (मेस्टा) उपस्थित केला आहे. शैक्षणिक अ‍ॅप सुरू करणार्‍या कंपन्यांवर कोणतेही निर्बंध नसल्याने पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे शिक्षणाचा बाजार मांडणार्‍या या शैक्षणिक अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मेस्टाकडून करण्यात येत आहे. ऑनलाईनच्या नावाखाली काहीही शिकवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्‍या अ‍ॅपवर बंदी न घातल्यास मेस्टा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी दिला आहे.

Related posts

‘गट क’ आणि ‘गट ड’ संवर्गांतील विविध पदांसाठी २५ व २६ सप्टेंबर परीक्षा; ९ लाखांहून अधिक परीक्षार्थ

Voice of Eastern

भारतीय वंशाचे क्रिप्टो उद्योजक संदीप नैलवाल यांचा सर्वाधिक प्रभावशाली ३० व्यक्तींमध्ये समावेश

Voice of Eastern

Leave a Comment