मुंबई :
मुंबई महापालिकेचा एम पूर्व प्रभाग म्हणजेच मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर हा परिसर. या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टया आहेत. झोपडपट्टीतील रहिवाशांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बक्कळ नफा कमावण्यासाठी मानखुर्द-गोवंडी भागात बेकायदा नर्सिंग होम, हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याची माहिती पालिका अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना असूनही या बेकायदेशीर नर्सिंग होमवर कारवाई करण्यात येत नाही. सामाजिक कार्यकर्ते आणि सत्यमेव जयते संघटनेचे राज्य महासचिव सुनील शिरीषकर यांनी बेकायदा नर्सिंग होममधून नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मानखुर्द व गोंवंडीमध्ये तब्बल २८ बेकायदा नर्सिंग होम आहेत. यातील १९ नर्सिंग होम हे फक्त गोवंडीमध्ये आहेत तर ६ नर्सिंग होम हे मानखुर्दमध्ये आहे.
मानखुर्द – गोवंडीतील बेकायदा नर्सिंग होमची यादी :
- खान नर्सिंग होम, बैंगणवाडी, गोवंडी
- सहारा नर्सिंग होम, शिवाजी नगर, गोवंडी
- साजिदा नर्सिंग होम, बैंगणवाडी, गोवंडी
- अल झारा मॅटर्निटी होम अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर क्लिनिक, बैंगणवाडी, गोवंडी
- रझ्झा हॉस्पिटल, बैंगणवाडी, गोवंडी
- चारू नर्सिंग होम, बैंगणवाडी, गोवंडी
- प्रेरणा नर्सिंग होम, बैंगणवाडी, गोवंडी
- आलिया हॉस्पिटल, बैंगणवाडी, गोवंडी
- मेहता हॉस्पिटल, बैंगणवाडी, गोवंडी
- मुस्कान एनआयसीयू अॅण्ड चिल्ड्रेन होम, शिवाजी नगर, गोवंडी
- अपना हॉस्पिटल, शिवाजी नगर, गोवंडी
- मिलेनियम हॉस्पिटल, शिवाजी नगर, गोवंडी
- लोटस हॉस्पिटल, शिवाजी नगर, गोवंडी
- मन्नत हॉस्पिटल, शिवाजी नगर, गोवंडी
- न्यू अपना हॉस्पिटल, शिवाजी नगर, गोवंडी
- शिफा नर्सिंग होम, गौतम नगर, गोेवंडी
- सिटी हॉस्पिटल, गौतम नगर, गोेवंडी
- भद्रा नर्सिंग होम, गोवंडी
- सबा हॉस्पिटल, लोट्स कॉलनी, गोवंडी
- मंगेश हेल्थ केअर सेंटर, लल्लुभाई कम्पाऊंड, मानखुर्द
- अपेक्स हॉस्पिटल, मोहीतेपाटील नगर, मानखुर्द
- पॅनासिया हॉस्पिटल, मोहीतेपाटील नगर, मानखुर्द
- सुर्यवंशी हॉस्पिटल, मोहीते पाटील नगर, मानखुर्द
- सागर नर्सिंग होम, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, मानखुर्द
- विश्वकर्मा हॉस्पिटल, सायन पनवेल हायवे, मानखुर्द
- ज्युपिटर हॉस्पिटल अॅण्ड डायग्नोस्टिक सेंटर, चिता कॅम्प, ट्रॉम्बे
- अमन हॉस्पिटल, चेंबूर
- स्टार हॉस्पिटल, मंडाला सिग्नल जवळ