Voice of Eastern

गेले दोन वर्ष कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यासह देशभरात अनेक निर्बंध पाहायला मिळाले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनेक निर्बंध शिथिल होत असल्याने लोकांचे जनजीवन सुरळीत होत आहे. यातच आता बे एके बे हे कविता आणि कवितांच्या गण्यांवरचा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. येत्या २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे याचे सादरीकरण होणार आहे.

नेमकं काय असणार?

काही जिवलग आणि समसमान विचार करणारे मित्र एकत्र आले की अस काहीतरी भन्नाट सुचत आणि मग त्याच बे एके बे होत. बे एके बे आयुष्यातल पहिलं गाणं जे आपण सुरात म्हणतो आणि आयुष्यभर सोबत घेऊन चालतो हा बे एके बेचा पाढा. या बे एके बे कार्यक्रमात सुद्धा तोच पाढा आहे पण आयुष्याचे गाणे गाणारा. नवोदित कवींच्या कविता, कवितेची झालेली गाणी आणि शब्दसुरांनी भावविवश करणारी मैफल असणार आहे. या कविता बालपणीचे भावविश्व उलगडतात, तरुण वयातलं प्रेम जागवतात आणि जगरहाटीच्या खेळात येणाऱ्या अनेक अनुभवांची अनुभूती देतात. इथले सूर मंत्रमुग्ध करतात, डोलायला लावतात आणि नाचवतातही. क्षणभर विश्रांती आणि मनभर आनंदासाठी अनुभवायलाच हवं.

आतापर्यंत अनेक ठिकाणी या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले असून पुन्हा एकदा ही मंडळी सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. तर तुम्ही देखील हे पाहायला विसरू नका.

या कार्यक्रमात आपल्या स्वरचित कविता स्वतः डॉ. गजानन मिटके सादर करणार आहेत. महत्वाचं म्हणजे लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता विनोद गायकर, सुलेखनकार अमोल मटकर. तसेच या कार्यक्रमात जागतिक शिळवादक निखिल राणे यांनी संगीतबद्ध केलेली गाण्यांची महफील रंगणार आहे. छोट्या मुलांपासून थोरामोठ्या सर्वांनाच आपलासा वाटणारा हा कार्यक्रम म्हणजे बे एके बे.

Related posts

आपण लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येऊ – जयंत पाटील

कोकणातील जिल्ह्यासाठीचा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा सादर

हे खाल्यास विविध रोगांपासून राहाल दूर!

Leave a Comment