Voice of Eastern

मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉर्म होमला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेकांचा बराचसा वेळ हा मोबाईल, कॅम्प्युटर व लॅपटॉपवर जात आहे. याचाच फायदा घेत काही ठगांकडून नागरिकांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. यामध्ये नोकारीच्या आमिषाने फसवण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंक ओपन करु नये अशी सूचनाही पोलिसांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून नागरिकांना एसएमएस किंवा व्हॉटपवर एक मोबाईल क्रमांक पाठवून त्या नंबरवर फोन करण्यास सांगण्यात येते. तसेच एक लिंक पाठवून ती लिंक ओपन करण्यास सांगून घरी बसल्या काम करा. अर्ध्या तासात नऊ ते वीस हजार रुपये कमविण्याची संधी असल्याचे आमिष दाखविले जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यास एक वेबपेज ओपन होते. त्यात तुमची माहिती नोंदणी करण्यास सांगून काही रक्कम ही क्यूआर कोडच्या माध्यमातून घेतली जाते. नोकरीसह इतर काही गुंतवणूक योजना सांगून तुमची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सायबर पोलिसांनी मुंबईकरांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा प्रकारचे मॅसेज आल्यास मुंबईकरांनी काय करावे यासाठी सायबर सेल पोलिसांनी एक माहिती प्रसिद्ध केली आहे. आपण सतर्क राहिल्यास सायबर ठगाकडून आपली फसवणूक होणार नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर कोणतेही व्यवहार करताना आपली गोपनीय माहिती कोणालाही शेअर करु नका असे आवाहनच पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

कोणती काळजी घ्यावी

  • मोबाईलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये.
  • नोकरी मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना योग्य ती काळजी घ्यावी.
  • व्हॉटसअ‍ॅपवर अनोळखी क्रमांकावर आलेल्या मॅसेजला खात्री केल्याशिवाय प्रतिसाद देऊ नये.
  • व्हॉटअपवर अनोळखी ग्रुपवर अ‍ॅड केले जात असल्यास त्या ग्रुपमधून तात्काळ बाहेर पडावे तसेच या ग्रुपला ब्लॉक करावे.
  • अनोळखी क्रमांकावरुन आलेले कोणतेही बारकोड स्कॅन करु नये.
  • ऑनलाईन वावरत असताना कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
  • कोणत्याही संकेतस्थळावरील वर्क फ्रॉम होमच्या जाहिातींना बळी पडू नका. अधिकृत संकेतस्थळावरच जाऊन ती जाहिरात खरी असल्याची खात्री करावी

Related posts

पूर्व उपनगरात जोरदार निदर्शने, पूर्वद्रुतगती मार्गावर विविध ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावलेल्या आयटीआय एनएसएस स्वयंसेवकाचा गौरव

महाराष्ट्र बंद परिणाम : मुंबईत शुकशुकाट मात्र पूर्वद्रुतगती महामार्गावर गाड्यांची वर्दळ

Leave a Comment