मुंबई :
महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय चार शिशुचा मृत्यू झाला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महानगर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रुग्णालयाला भेट दिली. बाळांचा मृत्यू होणं दुःखदायक आहे, मात्र यावर राजकारण अधिक क्लेशदायक असल्याचे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
मुंबईतील भांडुमध्ये असलेल्या सावित्रीबाई प्रसूती गृहामध्ये गेल्या तीन दिवसांत चार बालकांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यानंतर महापौर भांडुपमध्ये घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी येथील डॉक्टर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही चौकशी सुरू केली आहे. आत्तापर्यंत २६८ बालक दाखल झाली होती त्याच्यामध्ये आतापर्यंत २३४ बालकांना वाचविण्यात आपल्याला यश आलं आहे. तसेच हा प्रकार कसा घडला याची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गांभीर्य राखले पाहिजे होते
आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याचा बाबत बोलताना पेडणेकर यांनी सांगितले की, जशी प्रकृती तशी स्वभाव , पटेल आल्या त्यांनी चौकशी केली. त्यांनी जे काय वाक्य केलं त्याच्याशी मी सहमत आहे असं नाही. जी वेळ होती त्या वेळेचे गांभीर्य राखून बोलायला हवे होते