Voice of Eastern

भांडुप |

भांडुपमधे रस्त्यावर उभ्या असलेल्या ॲक्टिवा चोरी करून विकणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 10 चोरलेल्या ऍक्टिचा जप्त केल्या हा आरोपी ॲक्टिवा चोरी करून जुन्या गाड्यांचे नंबर प्लेट लावून विक्री करत होता.आरोपी हा मेकॅनिक असून कमी वेळात जास्त पैसे कमावण्यासाठी करत चोरी करत होता. भांडुप पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलिसांनी एक पथक तयार केलं त्यांनी सीसीटीव्ही तसेच आपल्या खबऱ्या कडून माहिती काढली आणि आरोपी किशोर शिर्के याला अटक केली असल्याचे भांडुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे सांगितले.

या आरोपीकडून आतापर्यंत दहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. भांडुपच्या परिसरात राहणारा किशोर शेळके हा मेकॅनिक गेल्या दीड महिन्यांपासून दुचाकी चोरून त नकली नंबर प्लेट वापरून शुल्लक किमतींमध्ये विकत असायचा यासाठी तो निर्जन स्थळावर पार्क केलेल्या दुचाकी हेरत असत आणि हँडल लॉक नसलेल्या दुचाकी डुप्लिकेट चावी वापरून त्या चोरी करायचा 21 सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे भांडुपच्या कोकण नगर परिसरातून एक गाडी चोरताना तो सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला होता. गाडी मालकाने गाडी चोरी झाली असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर आणि खबर यांच्या नेटवर्क च्या माध्यमातून त्यांनी शेळके याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून भांडुप तसेच मुलुंड परिसरातून चोरी केलेल्या दहा दुचाकी देखील हस्तगत केल्या आहेत.

Related posts

मुलुंड जकात नाक्यावर अडवला सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Voice of Eastern

कैटरीना कैफ बनली इतिहाद एअरवेजची ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबईच्या टोल नाक्यावर अन्न व औषध प्रशासनाची दूध तपासणीसाठी धडक मोहिम

Voice of Eastern

Leave a Comment