विक्रोळी |
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला देशातील काही राजकीय पक्षांनी सुद्धा समर्थन दिले आहे. महाराष्ट्रात देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
आज संयुक्त किसान मोर्चा ने भारत बंदची हाक दिली होती. केंद्रसरकारने शेतकऱ्यांना संदर्भात केलेले कायद्याच्या विरोधात हा भारत बंद होता. मुंबईच्या विक्रोळी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तर रास्ता रोको करण्यात आला. विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर बिंदुमाधव चौकात हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आले. आणि जवळपास पाच ते दहा मिनिटं रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला बाजूला प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता रस्त्यावर झोपून काही वेळ रस्ता रोको केला पोलिसांची कुमक आल्यावर त्यांना बाजूला काढण्यात आली.
केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी काळ्या कायद्याचा आम्ही विरोध करत आहोत. हे कायदे लवकरात लवकर पाठी घेतले पाहिजे. आमचा पक्ष हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हा कायदा लवकरात मागे घेतला पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी तालुका अध्यक्ष अब्दुल अन्सारी यांनी सांगितले.