Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

हरकती व सूचनांच्या माध्यमातून भाजप देणार प्रभाग रचनेला आव्हान

banner

मुंबई :

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत शिवसेनेला फायदा व्हावा यासाठी काही प्रभाग रचनेत जाणीवपूर्वक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फटका भाजपला बसणार असल्याने या प्रभागांबाबत भाजप हरकती व सूचनांच्या माध्यमातून प्रभाग रचनेला आव्हान देणार आहे. भाजपकडून नोंदवण्यात आलेल्या हरकती व सूचनांची दखल न घेतल्यास भाजपकडून न्यायालयाची दारे ठोठावण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, आमदार राजहंस सिंह, आमदार मिहीर कोटेचा आणि भाजपचे पालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी दिला आहे.

१ फेब्रुवारीला पालिकेच्या २३६ प्रभागांच्या पुनर्रचनेचे प्रारूप जाहीर करण्यात आले. या प्रभाग रचनेत सर्व प्रभागांच्या सीमा रेषा बदलण्याबरोबरच क्रमांकही बदलण्यात आले. यामध्ये भाजपचे मुलुंडमधील नगरसेवक नील सोमय्या, माझ्या प्रभागात तसेच काही भाजपच्या आणखीन काही नगरसेवकांच्या प्रभागात बदल करण्यात आला आहे. हे बदल राजकीय हेतूने करण्यात आल्याने त्याचा फटका भाजपच्या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. तसेच प्रभाग पुनर्रचनेत महामार्ग, रेल्वे मार्ग, रस्ते, नाले यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती प्रभाकर शिंदे यांनी दिली. या प्रभाग पुनर्रचनेविरोधात भाजप नगरसेवकांकडून हरकती व सूचना मांडण्यात येणार असल्याचेही प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. मुलुंडमधील माझा प्रभाग रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला विभागण्यात आला आहे. माझा मूळ विभाग ५ किलोमीटर इतका केला असून, रेल्वेच्या मार्गाच्या पलीकडील जवळपास ४० टक्के भाग माझ्या विभागात समाविष्ट केला असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव व नगरसेवक नील सोमय्या यांनाही या प्रभाग पुनर्रचनेचा फटका बसणार आहे. नील सोमय्याच्या प्रभागातील १० बूथ काढून माझ्या प्रभागात समाविष्ट केले असल्याचेही प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

Related posts

दहावीची परीक्षा आज संपली!

नवभारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षक, शिक्षकेतर यांना वगळण्यात यावे – शिक्षक भारती

महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी घोडदौड

Leave a Comment