Voice of Eastern

मुंबई :

मुंबईच्या नौदल डॉकयार्ड इथे असलेल्या आयएनएस रणवीरच्या एका कंपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री अचानक स्फोट झाला.  या स्फोटात तीन नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला.

आयएनएस रणवीर ही युद्धनौका डॉकयार्ड येथे तैनात असताना अचानक मोठा स्फोट झाला.
स्फोटानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित आणि तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या. या घटनेत मोठी वित्तहानी झाली नाही. मात्र तीन नौदल कर्मचारी शहीद झाले. आयएनएस रणवीर ही युद्धनौका ही नोव्हेंबर २०२१ पासून पूर्व नौदल कमांडमधून क्रॉस कोस्ट कार्यवाहीसाठी डॉकयार्ड येथे तैनात होती. लवकरच ही नौका आपल्या तळावर परत जाणार होती. या घटनेसंदर्भात बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहे.

Related posts

मार्डच्या बंदमुळे आज ओपीडी, ऑपरेशन राहणार बंद

Voice of Eastern

काळबादेवी येथे म्हाडा इमारतीचा धोकादायक भाग कोसळला; ६० – ७० जण बचावले

सुट्टीकाळात शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करू नका!

Leave a Comment