मुंबई :
मुंबईत काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ तसेच ओमायक्रॉनचा झालेला शिरकाव या पार्श्वभूमीवर पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. तिसर्या लाटेला रोखण्यासाठी पालिकेने कोविड सेंटर, बेड्स तयार ठेवले आहेत. सध्या मुंबईत १० जम्बो सेंटर असून त्यात १६ हजार बेड्स आहेत. यातील पाच जम्बो सेंटर सुरु असून त्यावर ५ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास आवश्यकतेनुसार बेड्स उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत काहीशी वाढ होत असून, ओमायकॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा मुंबईत शिरकाव झाला आहे. त्यामुळे तिसर्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत १० जम्बो सेंटर आहेत. यातील सध्या वरळी, नेस्को, बीकेसी, भायखळा, मुलुंड हे पाच सेंटर सुरु ठेवले आहेत. १० जम्बो सेंटरमध्ये १६ हजार बेड्स उपलब्ध आहेत. सध्या सुरु असलेल्या पाच जम्बो सेंटरमध्ये फक्त पाच टक्के रुग्ण असून ते उपचार घेत आहेत. रुग्ण वाढल्यास सर्व रुग्णालयात बेड्सची संख्या एक लाखापर्यंत वाढवण्याची तयारी पालिकेने केली आहे. खाटासंह व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी यंत्रणा पालिकेने सज्ज ठेवली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.