मुंबई :
विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये संपत्तीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावावर धारधार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेला मोठा भाऊ विजय साळवी (५६) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असू लहान भाऊ उत्तम साळवी (५५) याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे.
साळवी बंधुमध्ये काही दिवसांपासून संपत्तीवरून सातत्याने वाद होत होते. गुरुवारी सकाळी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये उत्तमने विजय साळवी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये विजय गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळील रुग्णालयामध्ये दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले
काही तासातच हल्ला करणाऱ्या उत्तम साळवीला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास चालू असल्याचे विक्रोळी पोलिसांकडून सांगण्यात आले. विजय साळवी हे बेस्ट मध्ये कामाला असून प्रभागांमध्ये समाजसेवक म्हणून परिचित होते.