Voice of Eastern

मुंबई :

सर्वसामान्य जनतेला परवडणार्‍या किमतीमध्ये उत्तम दर्जाची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने देशामध्ये जेनेरिक दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहेत. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत देशात सुमारे ८,६४० प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ११८५ केंद्र सुरू झाली आहेत.

केंद्रीय खते आणि रसायने मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने २००८ मध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत नागरिकांना स्वस्त दरात उत्तम दर्जाची जेनेरिक औषधे विकत घेता यावीत यासाठी देशभरात ठिकठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र या नावाने औषधांची दुकाने सुरु करण्यात आली. आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये ८,६४० प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे सुरु केली असून, यामध्ये सर्वाधिक ११८५ जन औषधी केंद्रे उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे केरळ ९७६, कर्नाटक ९६०, तामिळनाडू ८६३, महाराष्ट्र ६२५, गुजरात ५५१, दिल्ली ३८१, ओडिशा ३४७, पंजाब ३०४, बिहार २७६, छत्तीसगड २४१, मध्य प्रदेश २४०, हरियाणा २३४, उत्तराखंड २१६, पश्चिम बंगाल १८६, आंध्र प्रदेश १८३, तेलंगणा १६०, राजस्थान १३९, जम्मू आणि काश्मिर १२१, आसाम ८८, झारखंड ७६, हिमाचल प्रदेश ६४, अरुणाचल प्रदेश २८ आणि गोवा १० असे केंद्र सुरू झाले आहेत.

जेनेरिक औषधी म्हणजे सर्वसाधारणपणे वापरली जाणारी औषधे देखील असतात. सध्या १,४५१ औषधे आणि शस्त्रक्रियांसाठी लागणार्‍या २४० वस्तू जेनेरिक स्वरूपात उपलब्ध आहेत. यात सर्व महत्वाच्या उपचारात्मक औषधांचा समावेश आहे. यात, कार्डिओव्हॅस्क्यूलर म्हणजे हृदयरोग, कर्करोग विरोधी, मधुमेह विरोधी, संसर्ग रोखणारी औषधे, ऍलर्जी प्रतिबंधात्मक औषधे, जठराशी संबंधित आजारावरील औषधे,निसर्गोपचाराशी संबंधित औषधे अशा सर्व औषधांचा समावेश आहे. देशभरात सुरु असलेल्या ८,६०० प्रधानमंत्री जन औषधी केंद्रातून ही सगळी औषधे उपलब्ध आहेत.

Related posts

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पालिका सज्ज; १६ हजार बेड्स उपलब्ध

Voice of Eastern

एसटीची `स्वच्छता मोहीम’चे भवितव्य अडचणीत; १३५ हून अधिक बस स्थानकावर सुलभ शौचालयांची दुरवस्था

Voice of Eastern

मुंबई विद्यापीठाच्या अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षा १८ व १९ जुलैला होणार

Voice of Eastern

Leave a Comment