Voice of Eastern

मुंबई :

भारतभरातील वंचित पार्श्वभूमीमधील मुलांना दर्जेदार शिक्षण व डिजिटल अध्ययन संधींसह सक्षम करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसह बायजू’ज एज्युकेशन फॉर ऑलने नुकतेच भारतातील कर्करोगग्रस्त रूग्णांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता, निदान करण्यासोबत उपचार देणारी पहिली स्वयंसेवी, ना-नफा तत्त्वावर आधारित राष्ट्रीय संस्था इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस) सोबत सहयोग केला आहे. तीन वर्षांच्या सहयोगांतर्गत संपूर्ण भारतात राबवण्यात येणार्‍या उपक्रमाचा कर्करोगामधून वाचलेल्या दोन हजार मुलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे.

इंडियन कॅन्सर सोसायटीसोबतचा सहयोग २०२५ पर्यंत भारतभरातील १० दशलक्ष वंचित मुलांना सक्षम करण्याप्रती असलेली बायजू’जची कटिबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. एज्युकेशन फॉर ऑल आणि इंडियन कॅन्सर सोसायटी उपलब्धतेसंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि भारतातील विविध खाजगी व अनुदानित शाळांमधील इयत्ता ४ थी ते १२ वी पर्यंतच्या कर्करोगामधून वाचलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी सहयोगाने काम करत आहेत. या मुलांना बायजू’ज लर्निंग अ‍ॅपवरील विशेष कन्टेन्ट उपलब्ध होईल, जो प्रत्येक मुलाच्या अध्ययन गरजांनुसार वैयक्तिकृत व डिजिटली सक्षम आहे. आयसीएस येथे चाइल्डहूड कॅन्सर सर्व्हायवर्सना साह्य करणारा समूह उगमच्या स्थापनेसह २००९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या त्यांच्या सर्व्हायवरशिप उपक्रमाचा भाग म्हणून जुलै २०१७ मध्ये डॉ. डी. जे. जुस्सावाला एज्युकेशन अ‍ॅण्ड व्होकेशनल स्किल्स फंड लाँच करण्यात आला. या फंडचे उद्दिष्ट चाइल्डहूड कॅन्सर सर्व्हायवर्सना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, त्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यास मदत करणे हा आहे, कारण या मुलांच्या कुटुंबांना मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो.

समान शिक्षणाच्या संधींसह मुलांना सक्षम बनवण्याचे समान उद्दिष्ट जोपासत बायजू’ज एज्युकेशन फॉर ऑल आणि इंडियन कॅन्सर सोसायटी एकत्रितपणे तरुण कॅन्सर सर्व्हायवर्सना त्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी मदत करेल. हे आयसीएसच्या आफ्टर कॅन्सर केअर उपक्रमांतर्गत रूग्णांना दिलेल्या समर्थनाशी सुसंगत आहे. २०२५ पर्यंत १० दशलक्ष वंचित मुलांना सक्षम करण्याच्या आणि शैक्षणिक परिसंस्थेमध्ये सकारात्मक पद्धतशीर बदल घडवून आणण्याच्या मिशनसह बायजू’ज एज्युकेशन फॉर ऑल उपक्रमाने २६ राज्यांमधील १४० हून अधिक एनजीओंच्या माध्यमातून ३.४ दशलक्ष मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

‘बायजू’जमध्ये आम्ही प्रत्येक मुलाची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी विचारात न घेता शिक्षण सुलभ करण्यासाठी कटिबद्ध आहोत. कर्करोगापासून वाचलेल्या मुलांसाठी डिजिटल लर्निंग प्रोग्राम्स सुलभ व्हावेत. त्यांना पुढे जाण्यास मदत व्हावी यासाठी इंडियन कॅन्सर सोसायटीसोबत काम करत आहोत. आमचे लर्निंग प्रोग्राम्स आणि वैयक्तिक डिजिटल लर्निंग टूल्सची उपलब्धता त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत करेल.
– मानसी कासलीवाल, उपाध्यक्ष, बायजू’ज सोशल इनिशिएटिव्हज

कर्करोगामुळे उद्भवणार्‍या वेदनांचे निर्मूलन आणि व्यवस्थापन करताना इंडियन कॅन्सर सोसायटी समाजातील कर्करोगापासून वाचलेल्यांचे पुनर्वसनासाठी जागरूक आहे. त्यांचा सर्व्हायव्हर सपोर्टवरील राष्ट्रीय उपक्रम विशेषत: कर्करोगावर मात केलेल्या मुलांवर लक्ष केंद्रीत करतो. या आव्हानात्मक कार्यामध्ये बायजू’ज डिजिटल शिक्षणाचा वापर करण्यात येत आहे.
– हरी एल. मुंद्रा, अध्यक्ष, इंडियन कॅन्सर सोसायटी

Related posts

उपनगरात महापालिका बसवणार ७५ डायलिसिस मशीन 

Voice of Eastern

सावधान : पुढील दोन दिवस घरातून बाहेर पडू नका!

१५ डिसेंबरपासून शाळेच्या श्रीगणेशासाठी पालिका सज्ज

Voice of Eastern

Leave a Comment