Voice of Eastern

मुंबई :

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत तांत्रिक व अतांत्रिक १४ संवर्गाच्या ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला हजर असलेल्या सर्व उमेदवारांचे आक्षेप व नॉर्मलायझेशननंतरचे गुण म्हाडाच्या http://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली.

म्हाडा सरळ सेवा भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराबाबत असहिष्णू धोरण अवलंबिण्यात आले आहे. याच धोरणानुसार परीक्षेच्या वेळी गैरप्रकार करताना आढळलेल्या किंवा गैरप्रकार करण्याच्या प्रयत्नात असणारे उमेदवार किंवा व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस तपासात ज्या उमेदवार किंवा व्यक्तींची नावे समोर येत आहेत त्यांची सर्व माहिती पोलिसांना पुरविण्यात येत असून पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती सागर यांनी दिली.

भरती प्रक्रियेसंदर्भातील पुढील प्रक्रियेमध्ये देखील पूर्ण काळजी घेण्यात येणार असून ज्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीकरता बोलावण्यात येणार आहे, त्या सर्व उमेदवारांचे परीक्षेचे लॉग डिटेल्स तपासण्यात येणार आहेत. लॉग डिटेल्सच्या आधारे त्या उमेदवारांचे वर्तन विश्लेषण (Behaviour Analysis) करण्यात येणार असून हे विश्लेषण शंकास्पद असल्यास त्याची योग्य त्या यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Related posts

नवीन ग्रंथालय इमारत मार्च अखेरीस होणार सुरू; मुंबई विद्यापीठाची माहिती

क्षयरोग नियंत्रणासाठी पालिका करणार १७ लाख लोकांची तपासणी

शिक्षणोत्सव समाजमाध्यमांवर झळकणार, फोटो, व्हिडिओ होणार अपलोड

Leave a Comment