Voice of Eastern
मुंबई :
४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने पुरस्कृत केलेल्या हालारी विसा ओसवाल समाज हॉल, दादर येथे सुरु असलेल्या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या रियाझ अकबर अलीने डिफेन्स ऑटोमिक एनर्जीच्या जी गावस्करला चुरशीच्या लढतीत २१-७, ३-१७ व २५-४ असे हरवून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.
जैन इरिगेशनच्या अनिल मुंढेने झारखंडच्या नानू मुखीला २५-०, २५-४ असे सहज पराभूत केले. पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या संदीप देवरूखकरने मेजर पोर्टच्या शैलेंद्र बर्वेला २५-५, २५-४ असे हरविले. तर जैन इरिगेशनच्या  माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेने चंदीगडच्या गोपाळ कक्करला २५-०, २५-१ असे हरवून दुसरे फेरी गाठली. आंतरराष्ट्रीय विजेता विदर्भाच्या इर्शाद अहमदने मणिपूरच्या एल. तैबानगनबाला २५-६, २५-७ असे नमवून आपली घोडदौड पुढे चालू ठेवली. उदयोन्मुख उत्तर प्रदेशच्या महम्मद अरिफने आसामच्या रंजीत बैस्याला २५-०, २५-७ असे नमविले.
युनियन बँक, ओएनजीसी, इंडियन ऑइल, हिंदूस्तान पेट्रोलियम व बँक ऑफ इंडियासह पुरस्कृत या स्पर्धेतील महिलांच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या समृद्धी घाडिगावकरने डिफेन्स ऑटोमिक एनर्जीच्या ऋतुजा राणेला २५-८, २५-० असे हरविले. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंजली संगमने कर्नाटकाच्या एस. स्टॅलिनाला २५-०, २५-९ असे पराभूत केले. एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या मंथाशा  इकबालने बी. एस. एन. एलच्या ओरेबिक देवीला २५-३, २५-१ असे हरविले. उत्तर प्रदेशच्या अंजली केसरीने आंध्रच्या वाय. हरिताला २५-०, २५-४ असे पराभूत केले.

Related posts

द चेंबूर जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा १४ जुलैपासून

रायगड जिह्यातील शाळा झाल्या डिजिटल!

लोणावळ्यातील कुमार रिसॉर्ट येथे होणार राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

Leave a Comment