Voice of Eastern

विक्रोळी :

विक्रोळीमध्ये बुधवारी ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिशा वेल्फेअर ग्रुप व महाराष्ट्र राज्य टू व्हीलर्स युजर्स असोसिएशनतर्फे  गजानन महाराज चौक येथे रस्ता रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आला. तर विक्रोळी विधानसभा भाजप कार्यालय वार्ड क्रमांक ११८ मध्ये मुंबई जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आघाडी सचिव राजेंद्र नवघणे तसेच स्वयंभू हनुमान नगरमध्ये ज्येष्ठ नागरिक सहदेव रांबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

गजानन महाराज चौकात राबवलेले रस्ता सुरक्षा अभियान

रस्ता सुरक्षा अभियान राबवले

विक्रोळी वाहतूक विभागाच्या मार्गदर्शनाखाली गजानन महाराज चौकात राबवलेल्या रस्ता सुरक्षा अभियान उपक्रमात पोलीस निरीक्षक विक्रोळी वाहतूक विभाग हुसेन जतकर यांनी वाहतूक नियम व सुरक्षितता महत्त्व सांगून त्याचे अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार मंगेश सांगळे, विनोद साडविलकर, दिनेश बैरीशेट्टी यांची प्रोत्साहनात्मक मार्गदर्शनपर भाषणे झाली.दिशा ग्रुपतर्फे झेंडा व चाॅकलेट तसेच महाराष्ट्र राज्य टू व्हीलर्स युजर्स असोसिएशन तर्फे नवीन दिनदर्शिका वाटप करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण, शिवसेना शाखा प्रमुख शंकर (नाना) ढमाले व वाहतूक पोलीस विक्रोळी विभागाचे पोलीस उप निरीक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

स्वयंभू प्रीमियर लीग

स्वयंभू प्रीमियर लीग क्रिकेट सामने उत्साहात

विक्रोळीतील स्वयंभू हनुमान नगर येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक सहदेव रांबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच तरुणांकडून आयोजित केलेल्या स्वयंभू प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांनी उत्साहात अधिकच भर घातली. यामध्ये आरव ११ संघाने जेतेपद तर उपविजेते पद प्रतीक ११ संघाने पटकावले. साईलीला संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

राजेंद्र नवघणे यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलेले ध्वजवंदन

राजेंद्र नवघणे यांनी केले ध्वजारोहण

विक्रोळी विधानसभा भाजप कार्यालय वार्ड ११८ मध्ये मुंबई जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आघाडी सचिव राजेंद्र नवघणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दत्तात्रेय शिखरे, भाजप मुंबई महिला सचिव ज्योती दुराफे, ईशान्य मुंबई कोकण महाविकास आघाडी जिल्हा सचिव चंद्रकांत नागोळकर, वॉर्ड क्रमांक ११८ चे अध्यक्ष रामचंद्र शिंदे, ओबीसी सेलचे अक्षय पाटोळे आणि जीवन आंबवडे, सर्व जेष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजसेवक उपस्थित होते.

गल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंचा सत्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण गावडे

Related posts

अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

डोंबिवलीत ६ लाखांची वीजचोरी उघड; २० जणांविरुद्ध कारवाई

राज्यात सात दिवसांमध्ये १७ हजार जणांना डोळे येण्याच्या साथीची लागण

Leave a Comment