Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल २०२२ मध्ये मुंबईकरांचा जल्लोष

banner

मुंबई :

दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या स्थळाचा कला व सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून गौरव करण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल – २०२२’  या  भव्यदिव्य तीन दिवसीय कलामहोत्सवाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २५ फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या महोत्सवाला नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट महोत्सवामध्ये सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य साहेब ठाकरे तसेच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कला महोत्सवाला भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर हे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी सर्व मान्यवरांसह कलामहोत्सवाच्या विविध उपक्रमांना भेट दिली. वनिता समाज सभागृह येथील ‘कलाक्षितीज’ या कलादालनामध्ये विविध कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून साकरलेल्या कलाकृतींना मनापासून दाद दिली. तसेच त्यांनी या कलामहोत्सवातील ‘फूड फेस्टिव्हल’ या उपक्रमाच्या व्यासपीठावरून महोत्सवाला भेट देणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांशी संवाद साधत आपल्या पार्काशी निगडीत असलेल्या आठवणींना उजाळा दिला. कलामहोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी स्वरसागर या संगीतसंध्येमध्ये ‘संगीत शिवस्वराज्य गाथा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. पार्क परिसरात आयोजित केलेल्या ऐतिहासिक शस्त्रे व गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनामुळे शस्त्रे व गडकिल्ल्यांविषयीची नवनवीन माहिती घेण्याची सुवर्णसंधी इतिहासप्रेमींना मिळाली. दिवसभर सुरू असलेल्या निसर्गचित्र व प्रत्यक्ष छायाचित्रण स्पर्धेमध्येही भाग घेणाऱ्या स्पर्धकांची संख्याही लक्षणीय होती.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट महोत्सवामध्ये पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा सन्मान करताना आयोजक साईनाथ दुर्गे

कलामहोत्सवाचा दुसरा दिवसही अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. दुसऱ्या दिवशी परिवहन मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना उपनेते सचिन अहिर व  मुंबईचे उपमहापौर सुहास वराडकर यांनी भेट दिली. संजय राऊत यांनी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून, आपली मराठी स्वाक्षरी करून मराठीचा गौरव केला. तसेच या दिवशी झालेल्या निसर्ग चित्रण स्पर्धेतील विजेत्यांना अनिल परब यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. पावनखिंड  ऐतिहासिक मराठी चित्रपटाच्या टीमनेही आवर्जून या कलामहोत्सवामध्ये आपली उपस्थिती दर्शवली.

नागरिकांकडून महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद

पार्क परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सेल्फी पॉइंटवरील लोकांचा उत्साह, स्वरसागर आणि फूड फेस्टिवल मधील लोकांची तुडुंब गर्दी,  निसर्ग व प्रत्यक्ष छायाचित्रण स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या या सगळ्यामुळे कला महोत्सवाच्या  दुसऱ्या दिवसाचे वातावरण एकदम  जल्लोषपूर्ण झाले होते, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल – २०२२ चे आयोजक आणि वेध फाऊंडेशनचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे यांनी दिली.

परिवहन मंत्री अनिल परब यांचीही उपस्थिती

Related posts

वाहन चालकाना आता लायसन्स मिळणार ऑनलाईन!

Voice of Eastern

मोबाईल टॉवर्समुळे आरोग्यावर परिणामाचा कोणताही पुरावा नाही; रहिवासी भागात टॉवर उभारण्याचा मार्ग मोकळा

टी २० विश्वचषकामध्ये भारताच्या विजयासाठी करणार १०१ महायज्ञ

Voice of Eastern

Leave a Comment