Voice of Eastern

मुंबई : 

मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर चित्रिकरणासाठी चित्रपट निर्मात्यांकडून नेहमीच पसंती दिली जाते. मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर २०२१-२२ या आर्थिक वर्षात १० चित्रपटांचे चित्रीकरण झाले असून, चित्रीकरणातून २.४८ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेला मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये रेल्वेच्या वेगवेगळ्या ठिकाणी १० चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात आले. यामध्ये ६ फिल्म्स, दोन वेब सिरीज, एक शॉर्ट फिल्म आणि एका जाहिरातीचा समावेश आहे. ‘२ ब्राइड्स’ या चित्रपटाचे चित्रिकरण येवला, कान्हेगाव स्थानकांवर विशेष ट्रेनसह १७ दिवस चालले. यातून रेल्वेला सर्वाधिक १.२७ कोटी इतके उत्पन्न मिळाले. आडारकी रेल्वे स्थानकावर ९ दिवसांसाठी विशेष ट्रेनसह झालेल्या चित्रिकरणातून ६५.९५ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले. २०२१-२२ या आर्थिक वर्षात चित्रिकरणातून मध्य रेल्वेला आतापर्यंतचे सर्वाधिक २.४८ कोटी इतके उत्पन्न मिळालेले आहे. यापूर्वी २०१३-१४ या वर्षामध्ये मध्य रेल्वेला १.७३ कोटी इतका उत्पन्नाचा उच्चांक होता. कोरोनाचे निर्बंध असूनही २०२०-२१ मध्ये ४१.१६ लाख महसूल मध्य रेल्वेने चित्रिकरणातून मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आपटा, पनवेल, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा, तुर्भे आणि वाडीबंदर सारखी रेल्वे यार्ड, सातारा जवळील आडारकी रेल्वे स्टेशन, येवला, मनमाड आणि अहमदनगरमधील कान्हेगाव स्टेशन, दादर, मुलुंड आरपीएफ मैदान आणि मुंबईकरांसाठी आकर्षण असलेले हिल स्टेशन माथेरान रेल्वे स्थानके ही चित्रिकरणासाठी सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत. चित्रपटाच्या चित्रिकरणाला परवानगी जलद गतीने मिळावी यासाठी सिंगल विंडो सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून चित्रिकरणाला परवानगी दिली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, जुने वाडीबंदर यार्ड, वाठार (सातारा जवळ) आणि आपटा स्थानक (पनवेल) यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांमुळे आणि प्रॉडक्शन हाऊसना कोणत्याही अडचणीशिवाय व विनाअडथळा परवानगी देण्याच्या पद्धतीमुळे मध्य रेल्वेला चित्रिकरणातून विक्रमी उत्पन्न मिळविता आले.
– अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

Related posts

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईत गोवरचे ५८४ संशयित रुग्ण; ७ लाख ३५ हजार २५४ घरांचे सर्वेक्षण

सर्व नाटयगृहांसाठी टाईप प्लॅन तयार करणार

Leave a Comment