Voice of Eastern

नवी दिल्‍ली :

यंदाच्या वर्षापासून अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी सामायिक पात्रता परीक्षा (सीईटी) आयोजित केली जाईल तसेच अशा प्रकारची पहिली परीक्षा चालू वर्ष अखेरीपर्यंत घेतली जाईल, अशी माहिती, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाअंतर्गत सर्व सहा स्वायत्त संस्थांच्या नॉर्थ ब्लॉक येथे आयोजित संयुक्त बैठकीत त्यांनी सांगितले की, डीओपीटी अंतर्गत राष्ट्रीय भरती संस्था (NRA) चालू वर्ष अखेरीपर्यंत अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी सीईटी घेण्याची तयारी करत आहे. यामुळे देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र उपलब्ध होऊन नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची भरती प्रक्रिया सुलभ होईल. ही गोष्ट गेम-चेंजर ठरेल असे ते म्हणाले.

सामायिक परीक्षा ही तरुण नोकरी इच्छुकांसाठी ‘नोकरी प्रक्रिया सुलभ’ करण्यासाठी डीओपीटीने केलेली सुधारणा आहे. तरुणांसाठी, विशेषतः दूरवरच्या आणि दुर्गम भागातल्यांसाठी हे मोठे वरदान ठरेल असे ते म्हणाले. ही ऐतिहासिक सुधारणा कुठल्याही पार्श्वभूमीच्या अथवा सामाजिक-आर्थिक स्तरातल्या सर्व उमेदवारांना समान संधी देईल. हा बदल महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी तसेच विविध परीक्षा द्यायला अनेक  केंद्रांवर जायचा प्रवास परवडत नाही, अशा उमेदवारांनाही मोठा फायद्याचा ठरेल असे ते म्हणाले. सुरुवातीला ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह १२ भाषांमध्ये घेतली जाईल आणि त्यानंतर राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीत उल्लेख केलेल्या सर्व भाषांचा यात समावेश केला जाईल असे मंत्री म्हणाले.

Related posts

यशच्या चाहत्यांनी ‘KGF-2’चे notebook पासून मोझ्याक पोर्ट्रेट साकारत रचला विश्वविक्रम

Voice of Eastern

दिवाळीत लक्ष्मी पावली, पेट्रोल डिझेल स्वस्त…

Voice of Eastern

रेल्वेखाली उडी मारून आईची आत्महत्या, कर्तव्यदक्ष पोलिसाने वाचवले चिमुकल्यांचे प्राण

Voice of Eastern

Leave a Comment