Voice of Eastern
  1. मुंबई

प्रादेशिक हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी अंदाज वर्तवला होता की वातावरण बदलामुळे 5 नोव्हेंबर नंतर राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे ही शक्यता तंतोतंत खरी ठरली आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

अरबी समुद्रात तसंच लक्षद्वीपदवळ कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पाऊस पडतोय. हा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबरपर्यंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वातावरणाबदलामुळे समुद्राच्या वाऱ्यांचा वेग अधिक रहाणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. ज्यात प्रामुख्याने उस्मानाबाद, बीड आणि लातुरात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. काल देखील ऐन दिवाळीत पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिकसह अनेक ठिकाणी काल पाऊस झाला. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे.

Related posts

मुंबई विद्यापीठाला पेट परीक्षेचा विसर

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील सफर होणार आरामदायी

Voice of Eastern

आयडॉलचे पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे प्रवेश आजपासून

Voice of Eastern

Leave a Comment