Voice of Eastern

मुंबई :

डिसेंबरमध्ये अचानक झालेल्या पावसानंतर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला होता. त्यानंतर कोरड्या हवामानामुळे थंडीत अधिकच वाढ झाली होती. येत्या शनिवार आणि रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Viram advt

कोकणासह मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ जानेवारीला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. २२ जानेवारीला मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर या ११ जिल्ह्यात ढगाळ हवामान राहून, पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

advt

२३ जानेवारीला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे. तर २१ आणि २२ जानेवारीला या जिल्ह्यात पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

Related posts

५८ वी पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : हिंगोली, मुंबई, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर यांची विजयी सुरवात

Voice of Eastern

पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३३ वर्षीय व्यक्तीवर परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये दुहेरी हात प्रत्यारोपण यशस्वी; आशियातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ठरली

Leave a Comment