Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमी

आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून चांदीवलीतील भक्तांच्या सुविधेसाठी छठ पुजेची व्यवस्था

banner

कुर्ला :

कोरोनाचे नियम पाळत चांदीवली विधानसभेतील शिवसेनेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उत्तर भारतीय बांधवांचे श्रद्धस्थान असलेले ( सूर्याची पूजा ) छ्ठमातेचे पूजन करण्यासाठी चांदीवली विधानसभा क्षेत्रात चार ठिकाणी खास कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली.

१० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ४ पासुन चार ठिकाणी सोय केली होती. यात १) शीतल सिनेमा मैदान, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, २) शिवाजी मैदान, काजुपाडा, कुर्ला पश्चिम, ३) महानगरपालिका मैदान, बामनडायापाडा, तुंगागाव पवई, ४) वस्ताद लहुजी साळवे मैदान, विजय फायर रोड, संघर्षनगर, चांदीवली आदी ठिकाणी यूपी आणि बिहारच्या भाविक भक्तांसाठी छठ पूजाची सर्व व्यवस्था आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेल्या दोन वर्षात सर्वच धार्मिक सण नियमांचे पालन करत साजरे करण्यात आले त्याप्रमाणे यंदा ही छठ पूजा साजरी केली जात आहे. चांदीवली विभागात गेल्यावर्षा प्रमाणे याही वर्षी आमदार दिलीप लांडे यांनी उत्तर भारतातील भाविकांना छठ पूजा करण्यासाठी कृत्रिम तलाव तयार करून सर्व सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचा लाभ घेत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पूजा करण्यात आली. मोठ्या भक्ती भावात हा सूर्य पूजा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.

दरम्यान शाखाप्रमुख नितीन गोखले, शैलेश निंबाळकर, बाबू मोरे, पार्वती शिंदे, उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष रामप्रसिद्ध दुबे, भास्कर सिंह आदी उत्तर भारतीय बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Related posts

भारतीयांपेक्षा परदेशी नागरिकांच्या आरोग्याची सरकारला काळजी

कोकण औरंगाबाद व नागपूर शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणी सुरू

जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी मोहन भागवतांनी सरकारला खडेबोल सुनवावे – महेश तपासे

Voice of Eastern

Leave a Comment