Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

नववर्षात गर्दी टाळण्याचे, आरोग्यदायी संकल्पांचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

banner

मुंबई :

थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवे. कितीही आव्हाने येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नववर्षाच्या स्वागतावेळी कोरोनाच्या संकटाचे भान राखत गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नववर्ष प्रारंभाच्या पूर्वसंध्येला केले आहे. नववर्ष आपल्याला नवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज झालो. हीच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिध्द व्हायचे आहे. कितीही आव्हाने येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवायचा आहे. नववर्ष सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन.

Related posts

या वेळेपासून होणार लालबागच्या राजाचे दर्शन बंद

Voice of Eastern

कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज

Voice of Eastern

नव्या सरकारच्या काळात वेतन कधीतरी वेळेवर होणार का? – एसटी कर्मचाऱ्यांचा टाहो

Leave a Comment