Voice of Eastern

मुंबई :

केद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, संशोधक वृत्तीला चालना मिळावी आणि नवसंशोधक घडावे ‘इन्स्पायर’ पुरस्कार जाहीर केले जातात. २०१९-२० या वर्षासाठी जाहीर झालेल्या इन्स्पायर पुरस्कारासाठी राज्यातून ३१ बालवैज्ञानिकांची निवड झाली आहे. यामध्ये पुणे व कोल्हापूर आघाडीवर आहे.

देशातील विविध राज्यातून वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणार्‍या विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी त्यांना ‘इन्स्पायर’ पुरस्कार देऊन गौरव केला जातो. २०१९-२० मध्ये राज्य सरकारच्या संकेतस्थळावर पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून नोंदणी करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून ऑनलाइन सादरीकरण केले. त्याचे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समितीने परीक्षण केले. त्यानंतर विविध शाळांमधील तब्बल ८८० मुलांनी २०२०-२१ मध्ये आपले विज्ञान प्रकल्प केंद्राकडे पाठवले होते. या स्पर्धेमध्ये खासगी शाळांबरोबरच महापालिकेच्या शाळांनी देखील नोंदणी केली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत या पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्राला ३१ बालवैज्ञानिक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्येही पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांनी बाजी मारली आहे. पुण्यातील ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याखालोखाल केंद्राकडपहिला क्रमांक पुण्याचा लागला तर कोल्हापुर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. त्याखालोखाल कोल्हापूरमधील ४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सांगली, साताऱ्यातून प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा

निवड झालेले विद्यार्थी सहावी ते दहावीपर्यंतचे असून, त्यांना विज्ञान आधारित मॉडेल बनवण्यासाठी सरकारकडून ३ ते ५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. या रकमेसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात किंवा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या खात्यावर जमा केली जाते.

जिल्हानिहाय निवड यादी

पुणे ६, कोल्हापूर ४, सांगली, सातारा ३, अमरावती २ आणि मुंबई शहर, अहमदनगर, नागपूर, नंदुरबार, गोंदिया, जळगाव, जालना, औरंगाबाद, बीड, अकोला, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे.

Related posts

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : १० महिन्यांमध्ये ८ हजारांहून अधिक रुग्णांना मदत

विक्रोळीतील महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे

रायगडमधील तळीये, केवनाळे, साखर या दरड कोसळलेल्या गावांसाठी १३.२५ कोटी

Leave a Comment