मुंबई :
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेंतर्गत १५ ते १८ वर्षातील मुलांच्या लसीकरणाला ३ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. मात्र लहान मुलांना कोठे लस दिली जाणार असा प्रश्न अनेक पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेने ही बाब लक्षात घेत सुरुवातीला १५ ते १८ वर्षांतील मुलांसाठी मुंबईत नऊ लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन या लसीचा वापर करण्यात येणार आहे. हे लसीकरण विनामूल्य असल्याने सर्व संबंधित पालकांनी आपापल्या पाल्यांची नोंदणी करुन घ्यावी आणि पाल्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. २००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील.
मुंबईतील ९ लसीकरण केंद्र
- ए, बी, सी, डी, ई विभाग – भायखळामधील रिचर्डसन क्रूडास भायखळा कोविड लसीकरण केंद्र
- एफ/उत्तर, एल, एम/पूर्व, एम/पश्चिम विभाग – शीव (सायन) येथील सोमय्या मैदानावरील जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- एफ/दक्षिण, जी/ दक्षिण, जी/उत्तर विभाग – वरळीतील एनएससीआय डोम जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- एच/पूर्व, के/पूर्व, एच/पश्चिम विभाग – वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- के/पश्चिम, पी/ दक्षिण विभाग – गोरेगाव पूर्वेकडील नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- आर/दक्षिण, पी/उत्तर विभाग – मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- आर/ मध्य, आर/ उत्तर विभाग – दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र,
- एन, एस विभाग – कांजूरमार्ग पूर्वेकडील क्रॉम्प्टन ऍण्ड ग्रीव्हस् जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- टी विभाग – मुलूंड पश्चिमेकडील रिचर्डसन क्रूडास मुलूंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
- रेल्वे कर्मचार्यांच्या मुलांसाठी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय, परळ