Voice of Eastern

मुलुंड :

लॉकडाऊननंतर दीड वर्षाने ४ ऑक्टोबरला शाळांच्या घंटा वाजल्या. शाळांच्या सर्व इमारती मुलांच्या किलबिलाटांनी गजबजल्या. मुलुंड ‘टी’ विभागातील मुलुंड कॅम्प शाळा संकुलात विभाग निरीक्षक गोरखनाथ भवारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांना दररोज शाळेत यायचे असा सल्ला देत शाळेने केलेल्या नियोजनाची पाहणी केली.

मुलुंड कॅम्प शाळा संकुलात मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. प्रवेशद्वारावर प्रथम मुलांकडून पालकांचे संमतीपत्रक घेण्यात आले. मुलांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. सर्व विद्यार्थी मास्क घालून व सामाजिक अंतर ठेवून शाळेत प्रवेश करत होते. वर्ग सुरु झाल्यावर मुख्याध्यापक मनोज पवार, वर्गशिक्षिका कल्पना कोलते, प्रशिक्षिका समृद्धी दप्तरदार, प्रशिक्षक प्रदीप निकम, शारिरीक शिक्षण शिक्षक दिलीप अहिनवे व संगीत शिक्षिका मंजुषा माने यांनी आपापल्या परीने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. विभाग निरीक्षक गोरखनाथ भवारी यांनी विद्यार्थ्यांना विचारले की, मुलांनो शाळेत आल्यावर कसं वाटतंय ? तुम्ही दररोज शाळेत येणार ना ? मुलांनी उत्साहात व एका सुरात हो… असा प्रतिसाद दिला. शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Related posts

राज्यभरात सोमवारी ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार

महाराष्ट्राची ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक

२०१३ मध्ये पालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना

Leave a Comment