Voice of Eastern

नवी मुंबई :

सिडको प्राधिकरणामध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (युडीसीपीआर- २०२०) लागू झाल्यामुळे त्याअंतर्गत मिळणाऱ्या परवानग्यांवरील भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सिडकोमधील बांधकाम विषयक परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी सिडको प्राधिकरणाची ऑनलाईन सॅप यंत्रणा सोपी आणि सुटसुटीत करण्यासोबतच तिथे ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  नवी मुंबईतील विकासकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्याअंतर्गत सिडकोमध्ये विविध परवानग्या मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबाची देखील त्यांनी दखल घेतली आहे.

युडीसीपीआर 2020 नुसार अतिरिक्त एफएसआय, प्रिमियम एफएसआय आणि टीडीआर मंजूर करण्यासाठी भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सिडको महामंडळ नियोजन प्राधिकरण असलेल्या क्षेत्रात नियोजन प्राधिकरणाच्या ५० टक्के आणि शासनाच्या २५ टक्के हिश्श्यामध्ये युडीसीपीआर-२०२० मधील तरतुदींनुसार या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी युडीसीपीआर – २०२० नुसार अतिरिक्त एफएसआय मंजूर केलेल्या भूखंडधारकासोबत सिडकोकडून सुधारित करारनामा करण्यात येणार आहे.

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली २०२० नुसार अतिरिक्त एफएसआय, प्रिमियम एफएसआय, टीडीआर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करणेबाबत महामंडळाने यापूर्वीच सॅप  प्रणालीची अंमलबजावणी केली असून येणाऱ्या काळात ती अधिक सोपी, सुटसुटीत आणि सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एफएसआय वापरात बदल किंवा इमारत परवानग्यांसाठी विकासकांच्या अर्जावर प्रक्रिया करताना पारदर्शकता कायम रहावी यासाठी सिडकोमध्ये ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ सेलची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिडकोमध्ये युडीसीपीआर -२०२० लागू करून त्याद्वारे मिळणाऱ्या विविध परवानग्यांवरील भाडेपट्टा भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्यात येणार आहे. सिडको प्राधिकरणाचा कारभार गतिमान करण्यासाठी ‘सॅप’ यंत्रणेचे सुसूत्रीकरण करणे आणि सिडकोमध्ये ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ सेलची स्थापना करण्याच्या निर्णयाचा फायदा  नागरिक आणि विकासकांना होईल.

– एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

Related posts

तीर्थक्षेत्र रामदास पठार प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित; निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार भरत गोगावले यांना साकडे

Voice of Eastern

कशाला आशीर्वाद?, जनतेचा जीव धोक्यात घालायला”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रेवर अप्रत्यक्षरित्या टीका

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचा मुंबई विद्यापीठाला फटका; चार इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षा

Voice of Eastern

Leave a Comment