Voice of Eastern

मुंबई :

शहरातील काही बड्या महाविद्यालयांनी गणपतीपूर्वी अकरावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ज्या महाविद्यालयांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले आहेत अशा महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच सोमवारी अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून त्याची प्रवेश प्रक्रियाही २४ तारेखेपर्यंत संपणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेर्‍या पार पडल्यानंतर ऑनलाइन तसेच कोट्यामधील प्रवेश मिळून एक लाख २७ हजार ९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. तसेच ऑनलाइन प्रक्रियेसाठी अर्ज केलेले एक लाख ६७ हजार २९६ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून याची प्रवेश प्रक्रिया २४ ऑगस्टपर्यंत पार पडणार आहे. शहरातील बहुतांश बड्या विशेषत: अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये ६५ ते ७० टक्के जागांवर प्रवेश झालेले आहेत. यामुळे या महाविद्यालयांनी वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. काही महाविद्यालयांनी तर गुरुवापासूनचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. पहिल्या दिवशी ओळख वर्गाची सुचनाही नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत ६७ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी तर दुसर्‍या फेरीत २४ हजार १४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. आतापर्यंत ३५ हजार ३६४ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश निश्चित केले आहेत.

Related posts

शिवसेनेचा धनुष्यबाण प्रभू रामचंद्रांचा आणि हिंदुत्वाचा धनुष्यबाण – एकनाथ शिंदे 

Voice of Eastern

मुंबईत १३ नोव्हेंबरला होणार जिओ मुंबई सायक्लोथॉन स्पर्धा

Voice of Eastern

स्वामी समर्थ कबड्डी : एकतर्फी विजयासह बीपीसीएल, आयएसपीएल, मध्य रेल्वे उपांत्य फेरीत 

Leave a Comment