Voice of Eastern

मुंबई :

रेल्वेमध्ये सीईएन ०१/२०१८ असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात मुंबई आरआरबीच्या पात्र वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या आरआरबीच्या उमेदवारांना मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी दिली होती. यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील वेटिंग लिस्टवर असलेल्या ४४८ उमेदवारांची संधी हुकली होती. ही बाब केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्यामुळे मुंबईतील रिक्त जागांची गरज मागवून मुंबईच्या वेटिंग लिस्ट उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.

रेल्वे बोर्डाकडून आरआरबीमार्फत गरजेनुसार लोको पायलटची परिक्षा घेतली जाते. त्यानुसार मेन पॅनेल व वेटिंग लिस्टची नावे जाहिर करण्यात येतात. केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी महाराष्ट्रातील या उमेदवारांवर होणारा अन्याय होऊ दिला नाही. आरआरबी मुख्य अधिकार्‍यांसोबत चर्चा करुन व या विषयाचा सतत पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या कार्यतत्परतेमुळे मुंबईच्या ४४८ उमेदवारांसहीत भारतातील आरआरबीचे ७४०० एएलपी वेटिंग उमेदवारांच्या नोकरीचे काम मार्गी लागत आहे. याविषयी रेल्वेकडून नोटीफिकेशन काढण्यात आल्याने मुंबईच्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे तसेच भारतातील आरआरबीचे एकूण ७४०० उमेदवारांचे काम मार्गी लागणार आहे. गेली अडीच वर्षे रखडलेले काम रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्यामुळे पूर्ण झाले आहे.

Related posts

कुमारांमध्ये ठाणे, उस्मानाबाद व पुणे, अहमदनगर तर मुलींमध्ये उस्मानाबाद, ठाणे व सांगली, नाशिक उपांत्य फेरी

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : प्रशांत – केशर उपांत्य फेरीत दाखल 

केईएममध्ये २२ डॉक्टरांना कोरोनाची लागण

Leave a Comment