राज्यात गेल्या काही दिवसात नारायण राणे विरुद्ध शिवसेना या विषयावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यावरील विधानानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर नारायण राणे यांना झालेल्या अटक व सुटकेची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली.
या प्रकरणाला आज एक आठवडा पूर्ण झाला असला तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दीक चकमक काही संपत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.