Voice of Eastern
ताज्या बातम्या मोठी बातमी शिक्षण

एलएलएमच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम; विद्यापीठाचे दुर्लक्ष

banner

मुंबई : 

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा १ जून ते १५ जुलैदरम्यान होणार असल्यातरी मुंबई विद्यापीठाने आपल्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र १० मे रोजी होणारी एलएलएम सत्र १ ची परीक्षा मुंबई विद्यापीठाकडून पुढे ढकलण्यात आली. एकीकडे विद्यापीठाकडून नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असे म्हटले जात असताना परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यातच परीक्षेचे सुधारित वेळापत्रकही जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेत परीक्षा १ जून ते १५ जुलैदरम्यान पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाला होता. हा गोंधळ दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात येईल असे जाहीर केले. मात्र मुंबई विद्यापीठाकडून ४ मे रोजी होणारी एलएलएम सत्र १ ची परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे परिपत्रक जाहीर केले. विद्यापीठाने अन्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक कायम ठेवत एलएलएमच्या सत्र १ च्या परीक्षा पुढे ढकलली. मात्र सुधारित वेळापत्रक जाहीर न केल्याने परीक्षा कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. परीक्षेबाबत विद्यापीठाकडून कोणतीच माहिती दिली जात नसल्याने परीक्षा जून किंवा जुलैपर्यंत लांबणीवर पडण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटू लागली आहे. विद्यार्थ्यांमधील हा गोंधळ व भीती दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पवार यांनी केली आहे.

अचानकपणे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलणे आणि परीक्षेचे सुधारित वेळापत्रक न दिल्याने विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकेतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने एलएलएम सत्र १ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे
– अ‍ॅड. सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडण्ट लॉ कौन्सिल

Related posts

महाडमधील या गावातील नागरिक अद्यापही पिताहेत गढूळ पाणी

कुलगुरूंचा स्थगन आयुधावरच घाव; विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल : मत्स्यव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Voice of Eastern

Leave a Comment