Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्याकडून अभिनंदन

banner

मुंबई :

मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसी कृत्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगून शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

वैयक्तिक कारणास्तव रूपा मोरे या सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी अचानक उडी मारण्याचा प्रयत्न केला. याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्र्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी डुबल आणि मिरगळ यांना अनपेक्षितपणे घडणारी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ महिलेस उडी मारण्यापासून प्रवृत्त करत रोखल्याने अनर्थ टळला. त्यांच्या या प्रसंगावधानाचे मंत्रालयात कौतुक होत आहे.

Related posts

मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्वीकारला

देवमाणूस फेम ‘नाम्या’ एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक

Voice of Eastern

Leave a Comment