Voice of Eastern

मुंबई : 

देशाचा ७३ संविधान दिवस राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने  मुंबईतील प्रसिद्ध भवन्स हजारीमाल सोमानी महाविद्यालयात देखील हा दिवस साजरा करण्यात आला. याच निमित महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि कथाहास यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने संविधानाचे महत्व तसेच भारतीय विद्या भवनचे संस्थापक कुलपती कन्हैयालाल माणेकलाल मुन्शी, भारताच्या संविधान सभेचे सदस्य आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीवरही होते, अशा यांच्या विविध कार्यावर प्रश्न संच तयार करून कुलपती मुन्शीजीची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
या कार्यक्रमात मुंबईतील नामांकित कॉलेजने आपला सहभाग नोंदवला.

सहभागी कॉलेज

  • एस एस टी कॉलेज
  • केबी कॉलेज
  • नॅशनल कॉलेज
  • एमसीटी लॉ कॉलेज
  • लाला लजपतराय कॉलेज
  • विल्सन कॉलेज
  • झुनझुनवाला कॉलेज
  • रुईया कॉलेज
  • अंधेरी भवन्स
  • सेंट झेवियर्स

अंतिम विजेते

प्रथम पारितोषिक – झुनझुनवाला कॉलेज

द्वितीय पारितोषिक – सेंट झेवियर्स

तृतीय पारितोषिक – अंधेरी भवन्स

आजची तरुण पिढी हे आपल्या देशाचा भवितव्य आहे. विद्यार्थांना आपला देशचा संविधानाबद्दल माहिती व्हावी याच उद्येशाने आमचा हा एक छोटेसा प्रत्यन आहे.
-प्रा. युवराज नलावडे, इतिहास विभाग प्रमुख, भवन्स महाविद्यालय

Related posts

मुंबई विद्यापीठात भरले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील छायाचित्रांचे प्रदर्शन

मुंबईतील गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या तीन हजारच्या पार

Voice of Eastern

झोपडपट्टीमधील रक्तदाबाचे रुग्ण महापालिका शोधणार

Leave a Comment