मुंबई :
गुरु नानक महाविद्यालयाच्या राज्य शास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त २३ ते २९ नोव्हेंबरदरम्यान संविधान सप्ताहाचे आयोजन केले आहे. नागरिकांनामध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी, यासाठी संविधान जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली.
संविधान सप्ताहमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आधार कार्ड दुरस्ती शिबीर, पॅन कार्ड शिबीर, विशेष मतदार नोंदणी शिबीर व झिरो बॅलेन्स बँक अकाउंट उघडणे असे विविध उपक्रमाचे आयोजन शिबिरादरम्यान केले आहे. या शिबिरांचा लाभ विद्यार्थी व विभागातील जनतेने घेतला. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला व सेल्फी बूथवर सेल्फी घेऊन मतदार नोंदणी केल्याचा आनंद व्यक्त केला. नव मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेला सेल्फी पॉईंट हा खास आकर्षण ठरला.
विद्यार्थ्यांना डिजिटल भारत या बद्दल जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून संविधान क्लबचे विद्यार्थी डिजिलॉकरबद्दल विद्यार्थ्यांना जागृत करत आहे. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रदर्शन भरवले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नोत्तरे व पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना संविधानावर आधारित चित्रपट दाखवणात येणार आहे. संविधान दिनी संविधानावर आधारित भेट कार्ड व गुलाब पुष्प देऊन शिक्षक, विद्यार्थी आणि विभागातील जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्या दिल्या व विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व पटून सांगितले.
संविधान सप्ताहाची सांगता शांतीवन पनवेल येथील आश्रम शाळेत भेटवस्तू देऊन करण्यात येणार आहे. संविधान सप्ताहचे आयोजन प्राचार्या पुष्पिन्दर कौर भाटिया यांचे मार्गदर्शन, राज्य शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुमित खरात यांचे नेतृत्व व प्राध्यापक नितेश राठोड यांच्या सहकार्याने करण्यात करण्यात आले.