Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबई विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह आता  महाविद्यालयांनाही उपलब्ध होणार – कुलगुरू

banner

मुंबई :

१४५ वर्षे जुने असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह हे महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र समारंभासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सोमवारी दीक्षांत समारंभात केली. त्यामुळे दीक्षांत सभागृहात पदवी स्वीकारण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोमावारी पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. राज्यपाल व कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला सन्मानीय अतिथी म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा.सुनील कुमार सिंह उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहास ऐतिहासिक महत्त्व आणि इतिहास आहे. हे सभागृहाची नोंद युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्येही झाली आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या सभागृहामध्ये दरवर्षी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. हे पदवी प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडून दीक्षांत सभारंभावेळी प्रातिनिधीक स्वरूपात ठरावीक विद्यार्थ्यांनाच देण्यात येते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांचे दीक्षांत सभागृहात कुलपती, कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारण्याचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे विद्यापीठाने विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना त्यांच्या दीक्षांत समारंभासाठी सभागृह उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवासेनेचे मुंबई विद्यापीठातील अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी या वर्षीपासून महाविद्यालयाला विद्यापीठाचे  हे ऐतिहासिक दीक्षांत सभागृह महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा केली. ज्या महाविद्यालयांना दीक्षांत सभागृहात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ करायचा असेल त्यांनी विद्यापीठाचे रजिस्टार प्रा. सुधीर पुराणिक यांच्याकडे संपर्क करून नोंदणी करण्याच्या सूचना केल्या. कुलगुरूंच्या या घोषणेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे दीक्षांत सभागृहात पदवी घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महाविद्यालयांना लगेचच कळवण्यात येईल
कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दीक्षांत सभागृह महाविद्यालयांना देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत तातडीने निर्णय घेऊन महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे कळवण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे रजिस्टार प्रा. सुधीर पुराणिक यांनी दिली.

कुलपती, कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र स्वीकारणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक सोनेरी क्षण असतो. आजपर्यंत तो काही मोजक्याच विद्यार्थ्यांच्या नशिबी येत असे. मी केलेल्या मागणीची कुलगुरूंनी योग्य दखल घेतल्याने आता प्रत्येक विद्यार्थ्याला हा क्षण अनुभवता येणार आहे.

– अ‍ॅड. वैभव थोरात, सिनेट सदस्य , मुंबई विद्यापीठ

Related posts

जन्मत:च कमी वजन, श्वसनाचा त्रास, आकडी अशा समस्यांचा सामना करणाऱ्या बाळाला कामा रुग्णालयातील डॉक्टरांकडून जीवदान

देशातील स्टार्टअप इकोसिस्टिममधे महाराष्ट्र प्रथम

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पालिका सज्ज; १६ हजार बेड्स उपलब्ध

Voice of Eastern

Leave a Comment