Voice of Eastern

मुंबई : 

गत आठवड्यात राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. अवघ्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ४४ हजारांचा टप्पा ओलांडला. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल १० हजार ९१८ ने घट झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या २० हजारांहून थेट १३ हजार ६४८ वर आली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने कमी झालेली रुग्णसंख्या दिलासादायक ठरली आहे.

राज्यात सोमवारी ३३,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६९,५३,५१४ तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,०६,०४६ इतकी झाली आहे. राज्यात सोमवारी ८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या १,४१,६४७ झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी बरे होणार्‍या रुग्णांची संख्या मात्र अधिक राहिली आहे. राज्यात सोमवारी २९,६७१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ६६,०२,१०३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत १० हजाराने घट झाली असताना मुंबईतील रुग्णसंख्येतही ५ हजार ८२६ ने घट झाली आहे. मुंबईमध्ये रविवारी १९,४७४ रुग्ण सापडले होते. तर सोमवारी हीच संख्या १३,६४८ इतकी कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीबाबत मुंबईसह महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. मुंबईत सापडलेल्या रुग्णांपैकी फक्त ७९८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ४६ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांपैकी अद्याही ७९ टक्के खाटा शिल्लक आहे.

ओमायक्रॉनचे ३१ नवे रुग्ण

राज्यात सोमवारी ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले ३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्णांच्या नमून्यांची तपासणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये पुणे मनपा २८, पुणे ग्रामीण २, पिंपरी चिंचवड १ यांचा समावेश आहे. ३१ नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या १२४७ इतकी झाली आहे. यापैकी ४६७ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Related posts

बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि महापालिकेच्या संकेतस्थळावरुन शोधा गणपती मंडळ व विसर्जन स्थळ

कर्करोगामधून वाचलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी बायजू’ज पुढाकार

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

Voice of Eastern

Leave a Comment