Voice of Eastern

मुंबई :

कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, राज्यात ओमायक्रॉनबरोबरच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. मागील आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८०० ते ९०० च्या घरात होती. मात्र, या आठवड्यात तीन हजारांचा टप्पा ओलांडत थेट दीड हजारांची मजल मारली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत ५०० ते ६०० ने वाढ झाल्याचे दिसून आली. तसेच राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही १०८ च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे लवकरच तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यामध्ये निर्बंध कडक करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी सरकारकडून करण्यात येत आहेे. वाढत्या ओमायक्रॉनबरोबरच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात ओमायक्रॉनचे २० रुग्ण आढळल्याने राज्यातील रुग्णसंख्या १०८ वर पोहोचली आहे. मागील चार दिवसांपासून राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २१ डिसेंबरला राज्यात ८२५ रुग्ण तर, २२ डिसेंबरला १२०१ रुग्ण, २३ डिसेंबरला ११७९ रुग्ण आणि २४ डिसेंबरला १४१० रुग्ण राज्यामध्ये सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये २१ डिसेंबरला ३१२ रुग्ण, २२ डिसेंबरला ४८० रुग्ण, २३ डिसेंबरला ६०२ आणि २४ डिसेंबरला ६७३ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या म्हणजे तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनचे २० नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. यातील १४ रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ६ रुग्णांचा अहवाल भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे मनपा १, पुणे छावणी बोर्ड ५, मुंबई ११, सातारा २, अहमदनगर १ यांचा समावेश आहे. २० रुग्णांपैकी १५ हे आंतरराष्ट्रीय प्रवासी, १ आंतरदेशीय प्रवासी तर ४ जण त्यांच्या संपर्कातील आहेत. यातील १ जण १८ वर्षांखालील असून, ६ जण ६० वर्षांवरील आहेत. या सर्व रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. तसेच १२ रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले असून, ७ रुग्णांचे लसीकरण झाले नाही, तर १ रुग्ण लसीकरणासाठी अपात्र ठरला आहे.

तारीख रुग्ण मृत्यू
२१ डिसेंबर – ८२५ १४
२२ डिसेंबर – १२०१ ८
२३ डिसेंबर – ११७९ १७
२४ डिसेंबर – १४१० १२

Related posts

पावसाळ्यात मॅनहोलवरील झाकणे काढणार्‍या नागरिकांवर होणार कारवाई

आनंदाने शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Voice of Eastern

पालघरच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम युद्धपातळीवर करा – रवींद्र चव्हाण

Leave a Comment