Voice of Eastern

मुंबई : 

येत्या महिन्याभरात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात जगभरात कोरोनाची आणखी एक लाट येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर रवी गोडसे यांनी दिला. मात्र ही लाट सौम्य असून त्यासाठी कोणताही बूस्टर डोस घ्यावा लागणार नाही, असा दिलासाही त्यांनी दिला. जयहिंद लोकचळवळ या संस्थेतर्फे आयोजित ग्लोबल कॉन्फरन्स २०२३ मध्ये गुणवत्तापूर्ण व परवडण्याजोगी आरोग्य व्यवस्थेतील जनतेचा अधिकार या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या सत्रात जयहिंद लोकचळवळीचे प्रणेते व संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनीही गुणवत्तापूर्ण व परवडणारी आरोग्य व्यवस्था या विषयावर आपलं मत मांडलं.

डॉ. रवी गोडसे यांनी विविध विषयांवर आपल्या बिनधास्त शैलीत मतं मांडली. भारतीय तरुणांमधील हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणाबाबत बोलताना त्यांनी लसीकरण आणि हृदयविकार यांच्यातील संबंध खोडून काढले. हृदयविकारासाठी बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव आदी गोष्टी कारणीभूत असू शकतात. पण लसीकरणामुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढलं, असं म्हणता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जयहिंद लोकचळवळ या संस्थेतर्फे मुंबईत ‘जनतेचा अधिकार’ या विषयावर तीन दिवसीय जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी या ग्लोबल कॉन्फरन्सच्या पहिल्या दिवशी गुणवत्तापूर्ण व परवडण्याजोगी आरोग्य व्यवस्थेचा जनतेचा अधिकार या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. रवी गोडसे आणि डॉ. सुधीर तांबे यांनी आपले विचार मांडले.

कोरोना लसीबाबत वेळोवेळी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. ही लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम दिसत असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. भारतात तरुणांमध्ये वाढलेल्या हृदयविकारांचं कारणही कोरोना लस असल्याचं सांगितलं जातं. पण हे बरोबर नाही. कोरोना लस आणि हृदयविकाराचं वाढतं प्रमाण यांचा थेट संबंध नाही, असं डॉ. गोडसे म्हणाले. तसेच नोव्हेंबरमध्ये कोरोनाची साथ येणार असून ती कोणालाही समजणार नसून त्याला बुस्टरची गरज भासणार नाही, असे वक्तव्य डॉ. रवी गोडसेने केले.

जागतिक परिषदेच्या पहिल्या दिवसाची सुरूवात जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी केली. तसेच त्यांनी जयहिंद लोकचळवळीची माहिती तरुण-तरुणींनी दिली. याशिवाय जैन समुहाचे अशोक जैन यांनी महात्मा गांधीजींचे विचार तरुणांना सांगितले. पाचवी जागतिक परिषद ही जळगांव मधील गांधी तीर्थावर होईल, अशीही घोषणा जैन यांनी केली. वक्ते हिरालाल पगडाल यांनी ‘सुदृढ लोकशाही’ या विषयावर तरुणांना मार्गदर्शन केले.

डॉक्टरांना युनिक नंबर द्या!

बनावट डॉक्टरांना चाप लावण्यासाठी सरकारने डॉक्टरांची ऑनलाईन नोंदणी सुरू करावी, अशी मागणी डॉ. गोडसे यांनी केली. ऑनलाईन नोंदणी झालेल्या डॉक्टरांना युनिक क्रमांक असेल. या युनिक नंबरवर प्रत्येक डॉक्टरची शैक्षणिक माहिती उपलब्ध असेल. तसंच त्या डॉक्टरला इतर डॉक्टरांनी दिलेलं रँकिंगही असेल, असा सल्ला त्यांनी दिला. या युनिक नंबरमुळे लोकांच्या मनात नेमकं कोणत्या डॉक्टरकडे जायचं, याबद्दल संभ्रम राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गुगलवर रिसर्च डॉक्टरांकडे जाण्याआधी करा!

भारतात रुग्णाला डॉक्टरने सल्ला दिला की, तो रुग्ण सर्वात आधी गुगलवर सर्च करून तो सल्ला योग्य आहे की नाही, ते तपासतो. तसंच इतर काही उपचार करता येतील का, याचीही चाचपणी करतो. याऐवजी डॉक्टरांकडे जाण्याआधी रुग्णांनी डॉक्टर चांगला आहे की नाही, हे बघावं. तसंच जो काही रिसर्च करायचा, तो आधीच करावा आणि डॉक्टर देतील त्या सल्ल्याचा आदर करावा, असंही ते म्हणाले.

परवडण्याजोगी आरोग्य व्यवस्था अशक्य?

सध्या भारतात खासगी रुग्णालयांत उपचाराचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. याबद्दल बोलताना डॉ. गोडसे यांनी परवडण्याजोगी आरोग्य व्यवस्था शक्य नसल्याचे संकेत दिले. जे स्वस्त आहे, ते मस्त कसे असेल आणि जे मस्त आहे, ते स्वस्त असणं शक्य नाही, असं ते म्हणाले. तसंच अमेरिकेतही आरोग्य व्यवस्था महागडीच आहे आणि त्यामुळेच तिचा दर्जा चांगली आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

Related posts

सरकारी शाळांमधील ७०० मुलांनी एलिव्हेट २०२३ मध्ये सादर केली गुणवत्ता व नेतृत्व कौशल्ये

Voice of Eastern

थायमोमासह मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या २८ वर्षीय रुग्णाला मिळाले नवे जीवन 

विधानसभा अध्यक्षांना जयंत पाटील यांनी भर सभेत विचारला जाब

Voice of Eastern

Leave a Comment