Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

शिवसेना नगरसेविकेवरती भ्रष्टाचार केल्याचा मनसेचा आरोप

banner

मुंबई

मुंबई महानगर निवडणुका काही दिवसातच होणार आहेत या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहेत. मनसेने देखील जोरदार तयारीला लागली. महानगरपालिकेचे सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांचे नवनवे घोटाळे बाहेर काढण्याचा धडाका लावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी वॉर्ड क्रमांक १५६ मध्ये महिला बचत गट आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून लाखो रुपयांची वसुली केली असल्याचा आरोप केला आहे.

दरमहिन्याला चेक दिले
या घोटाळ्याच्या संबंधित असलेल्या संघर्ष महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा मीना फडतरे यांच्याकडून नगरसेविका माटेकर यांनी महिन्याला ८९ हजार रुपयांचा धनादेश घेतला आहे . तसेच संघर्ष महिला विकास संस्थाही त्यांनी हडप केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. फडतरे यांनी देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून आपण स्वतः दरमहिन्याला चेक दिले असल्याचे सांगितले आहे.

६० ते ९० टक्के हिस्सा आम्हाला पाहिजे

मीना सुभाष फडतरे या संघर्ष महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा आहेत. पहिला नगरसेवकांच्या सांगण्यानुसार संस्थेला दत्तक वस्ती योजनेचे काम दिले जात होते. परंतु नंतर लॉटरी सिस्टम काढण्यात आली. मात्र कालांतराने लॉटरी सिस्टीम द्वारे हे काम करण्याची पद्धत सुरू झाली यामध्ये प्रभाग क्रमांक 156 येथे मीना फडतरे यांना हे काम मिळाले. काम मिळाल्यानंतर या ठिकाणी असलेले ननगरसेविका वारंवार बोलवायला लागले. महानगरपालिकेकडून येणारे पेमेंट दर महिन्याला येते त्यातून ६० ते ९० टक्के हिस्सा आम्हाला पाहिजे, नाहीतर काम करायला देणार नाही. वॉर्ड ऑफिसरला सांगून तुमची संस्था काळ्या यादीत टाकू अशी धमकी देण्यात आली. यानंतर जबरदस्तीने चेकवर स्वतःच्या भावाच्या आणि नगरसेविकेच्या दीराच्या नावाने चेक बनवण्यात आले असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

कारवाई करण्यासाठी अजून काय पुरावा द्यायचा

नगरसेविका अश्विनी नाटेकर यांचे दीर संजय परशुराम माटेकर यांच्या नावावर हे धनादेश देण्यात आले या संबंधित असलेले बँकेचे स्टेटमेंट देखील पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आले. याविरोधात 20 ऑक्टोंबर 2020 आली तक्रार करण्यात आली होती मात्र अजून देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे. कारवाई करण्यासाठी अजून काय पुरावा द्यायचा असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे

कोण आहेत अश्विनी माटेकर?

२०१७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तिकिटावरती अश्विनी माटेकर निवडणूक लढवली होती या ठिकाणी त्यांचा विजय देखील झाला होता. २०१८ साल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आठ पैकी सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता यापैकी अश्विनी माटेकर या एक आहेत. या घोटाळ्याच्या माध्यमातून मनसे एका दगडात दोन पक्षांची शिकार केली आहे.

Related posts

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ दिवस शाळेत आणि ५ दिवस घरात सोडवून घेणार प्रश्नपत्रिका

आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला १९ मेपासून सुरुवात

संस्थांचालकांना आळा घालण्यासाठी युवासेनेकडून यशोमती ठाकूर यांची भेट

Leave a Comment