Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमी

नगरसेवक सुरेश पाटील यांच्या विरोधातील भाजपची याचिका न्यायालयाने अखेर फेटाळली

banner

घाटकोपर

नगरसेवक तुकाराम उर्फ सुरेश पाटील यांच्या विरोधात भाजपच्या पराभूत उमेदवार माजी नगरसेविका रितू तावडे यांनी 2017 मध्ये न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका अखेर न्यायालयाच्या निकालातून फेटाळून लावली आहे.

 

शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढल्यामुळे सत्तेची मोठी स्पर्धा निर्माण झाली होती या 2017 च्या निवडणुकीत एकमेकांचे उमेदवार कमी करण्यासाठी पक्षानी शक्ती पणाला लावली असीच सर्व शक्ती प्रभाग क्रमांक 127 चे शिवसेना विजयी उमेदवार तुकाराम उर्फ सुरेश पाटील यांच्या विरोधात भाजपच्या माध्यमातून लावण्यात आली होती.

4500 मताधिक्य घेऊन सुरेश पाटील यांचा विजय झाला त्यांच्या संदर्भात अनधिकृत बांधकाम कारण पुढे करून भाजपचे पराभूत उमेदवार रितू तावडे यांनी स्वतः आणि भाजप नगरसेविका उज्वला मोडक व साक्षी दळवी यांच्या मार्फत न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने निष्पक्षपणे सूनवाई करवून दोन्ही पक्षाचे म्हणने ऐकून घेत त्यावर उज्वला मोडक यांची याचिका दंडा सहित फेटाळून लावली. संपूर्ण खटल्यात जेष्ठ वकील बाळकृष्ण जोशी व त्यांचे, सहायक ऍडवोकेट दर्शना पवार , वीरेंद्र पेठे, नील हेलेकर यांनी नगरसेवक सुरेश पाटील यांची बाजू समर्थपणे मांडली होती. या निकालामूळे विभागातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Related posts

आरोग्य भरती रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची सोशल मीडियावर हॅशटॅग मोहीम

राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या १७ प्रकल्पांची निवड

ITC चा वनस्पती आधारित मांस बाजारात प्रवेश; बर्गर पॅटीज आणि नगेट्स करणार लाँच

Voice of Eastern

Leave a Comment