Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

डेग्यू, मलेरियाची ६० हजार उत्पत्तीस्थाने नष्ट; पालिकेच्या कीटकनाशक विभागाची कामगिरी

banner

मुंबई

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना शहराला साथीच्या आजाराने विळखा घातलेला दिसून येत आहे. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पालिकेचे हे प्रयत्न फक्त पावसाळ्यापुरतेच मर्यादित नसून वर्षभर पालिकेकडून ही मोहीम राबवण्यात येते. नऊ महिन्यांमध्ये मलेरिया आणि डेग्यूची उत्पत्तीस्थान असलेली ६० हजार ठिकाणे मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून नष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये डेंग्यूची ५१ हजार १७० तर मलेरियाची ९ हजार ५६५ उत्पत्तीस्थानांचा समावेश आहे.

मुंबईमध्ये मागील दोन महिन्यांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सष्टेंबरच्या १२ दिवसांत डेंग्यूचे ८५ रुग्ण व मलेरियाचे २१० रुग्ण आढळले आहेत. मलेरिया व डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करत आहेत. मलेरिया, डेग्यूंच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिका फक्त पावसळ्यातच नव्हे तर वर्षभर काम करत असते. यातूनच जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून मलेरिया व डेेंग्यूची तब्बल ९३ लाख ६१ हजार ५२१ उत्पत्ती स्थानांची पाहणी केली. मलेरियाचा प्रसार करणार्‍या एनोफिलीस डासांची उत्पत्तीची स्थाने असलेल्या विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव अशा २ लाख ६४ हजार ३३३ ठिकाणांची तपासणी केली. तर डेंग्यूचा प्रसार करणार्‍या एडिस डासाची उत्पत्ती स्थाने असलेली पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल, पेट्री लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट अशी ९०लाख ९७ हजार १८८ ठिकाणांची तपासणी केली. तपासणी केलेल्या या ठिकाणांपैकी ९५६५ ठिकाणी एनोफिलीस डासांची उत्पत्ती असल्याचे आढळून आले. तर ५१ हजार १७० ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळून आले. डेंग्यू व मलेरियाची उत्पत्तीची आढळलेली ही सर्व ठिकाणे पालिकेकडून नष्ट करण्यात आली. मुंबईत जलद गतीने होत असलेली बांधकामे पाहता, डेंग्यू एडीस डासाची उत्पत्ती अधिकाधिक होत असल्याचे समोर आले आहे. पाण्याचे डबे, पाणी साठवण्याच्या टाक्या, रिकामे टायर, भांडी हे सगळे डेंग्यू प्रजनन स्थळे म्हणून काम करत आहेत. डेंग्यूचा ताप व मलेरिया हे अधिक वेगाने पसरणारे डासजन्य रोग आहेत

काय काळजी घ्याल?

  • डास कीटकनाशकांची फवारणी तीव्र केली पाहिजे
  • तापावर स्व-उपचार टाळा
  • डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर रक्त तपासणी करा.

१ जानेवारी ते ९ सप्टेंबरदरम्यान केलेली कारवाई

मलेरिया प्रसार करणार्‍या डासाचे नियंत्रण

  1. तपासलेली उत्पत्ती स्थाने – २,६४,३३३
  2. डासांची उत्पत्तीची आढळलेली स्थाने -९५६५

डेंग्यू प्रसार करणार्‍या डासाचे नियंत्रण

  1. तपासलेली उत्पत्ती स्थाने – ९०,९७,१८८
  2. डासांची उत्पत्ती आढळलेली स्थाने – ५१,१७०
  3.  छपर व आवारातून काढलेले टायर्स -१३,६८७
  4. छपर व आवारातून काढलेले ऑड आर्टिकल्स -३,३२,८८२

फेंगशुई झाडे, मनी प्लांट, फ्रीज, पेट्री लेट्स यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आढळून येते. त्यामुळे घरामध्ये शोभेच्या वस्तू ठेवू नका, आजाराला निमंत्रण देवू नका, मुंबईकरांनो तुम्हीच तुमच्या घराचे रक्षक व्हा आणि आजाराला दूर ठेवा.

डॉ. राजन नारिंग्रेकर, प्रमुख,किटकनाशक विभाग

Related posts

बकरी ईदसाठी महानगरपालिकेकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू

एस.एस.जी; श्रीराम, श्री गणेश, विजय क्लब उपउपांत्य फेरीत  

महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांसह एका अधिकार्‍याला एनएसएस पुरस्कार प्रदान

Leave a Comment